14 December 2024 2:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

Zilla Parishad Election Results 2021 | पंचायत समितीत काँग्रेस आणि अपक्षांची बाजी | मतदाराची पंजाला पसंती

Zilla Parishad Election Results 2021

मुंबई, ०६ ऑक्टोबर | राज्यातील 6 जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. तर पंचायत समित्यांमध्ये अनपेक्षितरित्या काँग्रेसनं मुसंडी मारल्याचं पाहायला मिळतंय. पंचायत समितीच्या 144 जागांपैकी 144 जागांचा कल हाती आलाय. त्यात इतर पक्ष किंवा अपक्षांना सर्वाधिक जागा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. त्या प्रमुख पक्षांपैकी काँग्रेसला जास्त (Zilla Parishad Election Results 2021) जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेना चौथ्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस पाचव्या क्रमांकावर फेकली गेल्याचं पाहायला मिळत आहे.

Zilla Parishad Election Results 2021. Out of 144 seats of Panchayat Samiti, 144 seats are up for grabs. It is seen that other parties or independents got the highest number of seats. Among those major parties, the Congress has won more seats :

पंचायत समिती पोटनिवडणूक (144 जागा)
भाजप – 33
शिवसेना – 22
राष्ट्रवादी काँग्रेस – 16
काँग्रेस – 35
इतर – 38

मतदारांनी काँग्रेसला साथ दिली – पटोले
सहा जिल्ह्यातील जनतेचे आभार आम्ही या जिल्हा परिषद, पंचायत समितीनिमित्त एक सुरुवात केली आहे. लोकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. काही ठिकाणी आम्ही संघटनात्मक मागे पडलो. तिथेही काही दिवसांत आम्ही काम करु. खरं तर आज भाजप देशातील वागणूक, शेतकरी विरोधी धोरण, वाढती महागाई, संविधान विरोधी धोरण या सगळ्याला कांग्रेसच थांबवू शकतं हे लोकांनी मान्य केलंय. त्यामुळे लोकांनी काँग्रेसला साथ दिल्याचं पाहायला मिळत आहे, असं पटोले म्हणाले.

लोकशाहीत जनता मोठी आहे. जनतेचा विश्वास सर्वात मोठा असतो. आमच्या काही चुका झाल्या त्या दुरुस्त करुन आम्ही जनतेसमोर जाऊ, असं मी म्हटलं होतं. त्याची सुरुवात आता झाली आहे. आज देश बरबाद होतोय. त्याविरोधात काँग्रेस लढत आहे. जिल्हा परिषदेत भाजप आमच्यापेक्षा पुढे आहे. मात्र पंचायत समितीत आम्ही त्यांच्यापेक्षा कितीतरी पुढे आहोत, असं पटोले म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Zilla Parishad Election Results 2021 congress became a top party.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x