14 December 2024 3:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Post Office Scheme | 2 लाखांच्या FD वर मिळेल 32,000 रुपये व्याज, पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना - Marathi News

Highlights:

  • Post Office Scheme
  • एवढे मिळते व्याजदर :
  • योजनेचा मॅच्युरिटी पिरियड :
  • किती पैसे गुंतवता येतील :
  • पैसे काढतीची देखील आहे सुविधा :
  • खातं उघडण्यासाठी काय करावे :
  • 2 लाखांच्या गुंतवणुकीवर अशी मिळेल व्याजाची घसघशीत रक्कम :
Post Office Scheme

Post Office Scheme | सरकारने महिलांसाठी आत्तापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत. महिलांना रोजगाराची संधी त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम मिळवून स्वतःचा उदरनिर्वाह त्याचबरोबर मुलींना शिक्षणासाठी पैसे आणि गरजू महिलांना घर चालवण्यासाठी त्यांच्या हातात काही रक्कम शिल्लक रहावी यासाठी अनेक योजना आहेत.

आज आम्ही अशाच एका योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत. ज्या योजनेचे नाव ‘महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट’ असं आहे. ही योजना केंद्र सरकारने 2023 वर्षापासून सुरू केली आहे. ही योजना केवळ महिलांसाठी असून, 18 वर्षांची कोणतीही महिला या योजनेचा भाग बनू शकते.

एवढे मिळते व्याजदर :
पोस्टाच्या महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट या योजनेमध्ये तब्बल 7.5% व्याजदराने व्याजदर प्रदान केले जाते. त्यामुळे कोणतीही महिला केवळ व्याजदरानेच जास्तीचे पैसे कमवू शकते.

योजनेचा मॅच्युरिटी पिरियड :
पोस्टाची महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट ही योजना केवळ दोन वर्षांसाठी आहे. परंतु या दोन वर्षांमध्ये कोणतीही महिला योजनेमध्ये लाखो पैसे गुंतवून घसघशीत व्याजाची रक्कम मिळवू शकते.

किती पैसे गुंतवता येतील :
या योजनेचा लाभ घेणारी कोणतीही महिला 2 लाख रुपयांची गुंतवणूक अगदी सहजरीत्या करू शकते. 1,000 हजार रुपयांपासून सुरू केलेली गुंतवणूक केवळ 2 लाखांपर्यंतच करू शकते. म्हणजेच या गुंतवणुकीची लिमिट 2 लाख रुपयांची आहे. 2 लाखांपेक्षा एकही रुपया योजनेमध्ये गुंतवता येणार नाही.

पैसे काढतीची देखील आहे सुविधा :
या योजनेची विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही या योजनेमध्ये गुंतवलेल्या पैशांपैकी एका वर्षानंतर गरजेनुसार ठरवून दिलेल्या टक्क्यानुसार तुम्ही मॅच्युरिटी पिरियड होण्याआधी म्हणजेच दोन वर्ष पूर्ण होण्याआधीच पैसे काढून देऊ शकता. त्यामुळे महिलांसाठी प्रचंड फायद्याची योजना आहे.

खातं उघडण्यासाठी काय करावे :
पोस्टाच्या महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट या योजनेमध्ये खात उघडण्यासाठी तुम्हाला तुमच्या घराजवळील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन स्वतःच्या नावाचं खातं उघडावं लागेल. तुम्ही तुमच्या आई, बहिण, मुलगी आणि पत्नीसह कोणत्याही महिलेचे खातं उघडू शकता. तर यासाठी तुम्हाला पोस्टामध्ये गेल्याबरोबर फॉर्म 1 घेऊन त्यावर स्वतःची वैयक्तिक माहिती भरावी लागेल. त्यानंतर ऍड्रेस प्रूफ द्यावं लागेल आणि आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो आणि ड्रायव्हिंग लायसन्स देखील द्यावं लागेल. म्हणजे तुमच्याजवळ स्वतःच ओळखपत्र असणे अत्यंत गरजेचे आहे.

2 लाखांच्या गुंतवणुकीवर अशी मिळेल व्याजाची घसघशीत रक्कम :
समजा एखाद्या महिलेने दोन वर्षांसाठी पोस्टाच्या ‘महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट’ या योजनेमध्ये 2 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर, दोन वर्षांसाठी दिलेल्या व्याजदरानुसार म्हणजेच 7.5% व्याजदराने 32,000 रुपये केवळ व्याजाचेच मिळतील. व्याजाची मिळणारी रक्कम 40,000 पेक्षा कमी असेल तर, या रकमेवर कोणत्याही प्रकारचे टॅक्स लावले जाणार नाही. त्यामुळे एखादी महिला या योजनेत 2 लाखांची गुंतवणूक करत असेल तर, तिला व्याजाची रक्कम म्हणून 32,044 एवढी रक्कम व्याजाची मिळेल. याचाच अर्थ मॅच्युरिटीवर 2,32,044 एवढी रक्कम परत मिळेल. त्याचबरोबर तुम्ही 1,50,000 रुपयांची गुंतवणूक केली असेल तर, मॅच्युरिटी पिरेडवर तुम्ही 1,74,033 रुपये मिळतील. यामधील व्याजाची रक्कम 24,033 एवढी असेल.

Latest Marathi News | Post Office Scheme 02 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(198)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x