13 December 2024 8:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

Post Office Scheme | गुंतवणूक 5 लाखांची आणि व्याजाची रक्कम मिळेल 2 लाख रुपये, जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' योजना

Post Office Scheme

Post Office Scheme | पोस्ट अंतर्गत मध्यमवर्गीय व्यक्तींसाठी अनेक योजना राबवल्या जातात. पोस्टाच्या प्रत्येक योजनेमध्ये नागरिकांना चांगली व्याजदर प्रदान करून रिटायरमेंटपर्यंत किंवा कमी काळाच्या गुंतवणुकीसाठी देखील जास्तीचा फायदा मिळवता येतो. या फायद्याच्या योजनेचे नाव टाईम डिपॉझिट योजना असं आहे.

पोस्टात जास्त टक्क्याने व्याज दिले जाते त्यामुळे सर्वसामान्यांना दीर्घकाळासाठी कमाईच्या गुंतवणुकीवर जमापुंजी जमवण्यासाठी मदत मिळते. तसे गुंतवणुकीचे इतरही मार्ग आहेत परंतु पोस्टात पैसे गुंतवणे सुरक्षिततेचे मानले जाते. आज आम्ही पोस्टाच्या अशाच एका जबरदस्त योजनेबद्दल सांगणार आहोत. ज्या योजनेमध्ये तुम्ही 5 लाखांची रक्कम गुंतवून 7 लाखांचा फंड जमा करू शकता. म्हणजे तब्बल 2 लाख रुपये तुम्हाला व्याजाचेच मिळतील. नेमकं काय आहे कॅल्क्युलेशन पाहूया.

किती टक्के व्याजदर दिले जाते :
पोस्टाच्या टाईम डिपॉझिटिव्ह योजनेमध्ये ग्राहकांना एका वर्षासाठी 6.9% व्याजदर प्रदान केले जाते. दरम्यान या योजनेमध्ये तुम्ही 2, 3 आणि 5 वर्षांकरिता पैसे गुंतवू शकता. 2 वर्षांसाठी 7.0% व्याजदर तर 3 वर्षांसाठी 7.1%. त्याचबरोबर पाच वर्षांसाठी 7.5% व्याजदर ग्राहकांना दिले जात आहे. एवढंच नाही तर कलम 80C अंतर्गत तुम्हाला टॅक्स सूटची सुविधा देखील देण्यात येते.

तुम्हीही उघडू शकता खातं :
पोस्टाच्या टाईम डिपॉझिटमध्ये सिंगलसह जॉईंट आणि तीन व्यक्ती मिळून एकत्रित खातं उघडू शकतात. दरम्यान तुम्हाला तुमच्या मुलांच्या नावावर योजना सुरू करायची असेल तर, तुम्ही त्यांचं 10 वय वर्ष उलटून गेल्यानंतर खातं उघडू शकता. त्याचबरोबर गुंतवणूकदार 1000 रुपये भरून गुंतवणूक सुरू करू शकतो. पैसे गुंतवण्याची लिमिट दिली गेली नाहीये त्यामुळे तुम्ही तुम्हाला हवे तेवढे पैसे गुंतवू शकता.

पोस्टाच्या टीडी योजनेसाठी अशा पद्धतीने खातं उघडा :
पोस्टाच्या योजनेमध्ये तुम्ही अल्पवयीन मुलाच्या नावाने आणि दोन प्रौढ व्यक्तींच्या नावाने संयुक्त खाते उघडू शकता. या खात्यात कोणतीही व्यक्ती फिक्स डिपॉझिट किंवा चेकद्वारे मुदत ठेव खाते उघडू शकते. तुम्ही ज्या दिवशी पैसे गुंतवाल त्या दिवसापासून तुमचे खाते उघडले गेले आहे असे मानण्यात येईल.

अनेक व्यक्तींनी पोस्टाच्या टीडी योजनेचा लाभ घेतला आहे. तुम्हाला देखील व्याजदराची चांगली रक्कम कमवायची असेल तर, लवकरात लवकर पोस्टाच्या टाईम डिपॉझिट योजनेमध्ये पैसे गुंतवणे सुरू करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office Scheme 15 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(198)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x