
Post Office Schemes | नोकरी करणारा प्रत्येक व्यक्ती कितीही कमी प्रमाणात पगार असला तरी सुद्धा आपल्या पगारातील काही रक्कम प्रत्येक महिन्याला सेविंग अकाउंटमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी गुंतवण्याचा प्लॅन करत असतो. आम्ही तुमच्यासाठी पोस्टाची एक भन्नाट योजना घेऊन आलो आहोत.
ज्यामध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला पैसे साठवून लाखोंच्या घरात नफा मिळवू शकता. आम्ही पोस्टाच्या एका स्मॉल सेविंग योजनेबद्दल सांगत आहोत. या योजनेचे नाव ‘पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट’ असं आहे. या योजनेची एक खास गोष्ट म्हणजे तुम्हाला योजनेअंतर्गत लोन प्राप्त होते.
पोस्टाची आरडी म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट योजना किती व्याज देते :
या योजनेचे व्याजदर तिमाही आधारावर कॅल्क्युलेट केले जातात. सध्या या योजनेचे व्याजदर 6.7% आहे. ही योजना पोस्टाच्या स्मॉल सेविंग योजनांपैकी एक आहे. आतापर्यंत बऱ्याच व्यक्तींनी पोस्टाच्या आरडीमध्ये आपले खाते उघडून लाखोंच्या घरात परतावा मिळवला आहे.
पोस्टाची आरडी 8 लाख रुपये कसे मिळवून देईल :
पोस्टाची आरडी योजना तुम्हाला 8 लाख रुपयांचा फंड कसा काय मिळवून देईल यावर आपण सविस्तर कॅल्क्युलेशन पाहूया. तुम्हाला पोस्टाच्या आरडीमध्ये प्रत्येक महिन्याला 5000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. ही गुंतवणूक तुम्हाला 5 वर्षांसाठी म्हणजेच मॅच्युरिटी पिरियडपर्यंत चालू ठेवायची आहे.
अशा पद्धतीने तुम्ही पोस्टाच्या आरडीमध्ये 3 लाखांची रक्कम जमा करता आणि 6.7% दराने व्याजदर देखील घेता. व्याजाने तुम्हाला 56,830 रुपयांची रक्कम मिळेल तर, मॅच्युरिटीवर संपूर्ण व्याजदर पकडून 3,56,830 रुपयांची रक्कम हाती येईल.
तुम्हाला पोस्टाच्या आरडी योजनेमधून आणखीन लाभ हवं असेल तर, 5 वर्षांसाठी योजना सातत्याने सुरू ठेवावी लागेल. आणखीन 5 वर्ष म्हणजेच गुंतवणुकीचे एकूण वर्ष 10. 10 वर्षांच्या कार्यकाळात तुम्ही पोस्टाच्या आरडी योजनेत 6,00,000 लाख रुपयांची रक्कम गुंतवाल त्यानंतर 6.7% दराने 2,54,272 एवढी रक्कम व्याजाने कमवाल आणि मॅच्युरिटी पिरियडनंतर 8,54,272 रुपयांची रक्कम मिळवाल. तर अशा पद्धतीने तुम्ही पोस्टाच्या आरडी योजनेमधून 8 लाखांपेक्षा जास्तीची रक्कम कमावू शकता. त्याचबरोबर पोस्टाची आरडी तुम्हाला लोन घेण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.