13 December 2024 8:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

आता बांधकाम कामगारांना मिळणार अवघ्या ५ रुपयात जेवण

Devendra Fadnavis, CM Devendra Fadnavis, Chief Minister Devendra Fadnavis, Atal Ahar Yojana

पुणे : कोणतीही इमारत किंवा प्रकल्प उभा करायचा असेल तर यात अत्यंत महत्वाची भूमिका असते ती म्हणजे बांधकाम कामगारांची. याच कामगारांना आता अटल आहार योजनेअंतर्गत अवघ्या पाच रुपयात जेवण उपलब्ध होणार आहे. अटल आहार योजना क्रेडाई पुणे मेट्रोच्या सहकार्याने हि योजना गुरुवारी सुरु झाली. कोणतीही इमारत उभी राहण्याच्या प्रक्रियेत कामगारांची महत्वाची भूमिका असते.

त्यामुळे त्यांना वेळच्यावेळी चांगले अन्न कमी दारात उपलब्ध होणे गरजेचे आहे. क्रेडाई पुणे यांच्या माध्यमातून हि योजना हि राबण्याची शासनाला पुढेही मदत करू असे आश्वासन कामगार कल्याण समितीचे अध्यक्ष श्रॉफ यांनी दिली. बाणेर येथील कल्पतरू जेड या बांधकाम प्रकल्पावर आयोजित कार्यक्रमात चारशेहून अधिक बांधकाम कामगारांना भोजन देऊन या प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले.

तसेच या योजनेनंतर कामगारांच्या कच्या घरासाठी व त्यांच्या शिक्षणासाठीची व्यवस्था करण्याचा अर्ज सरकारपुढे मांडला जाईल. जेणेकरून कामगारांना सुद्धा समाधानी आणि सुखकर आयुष्य जगता येईल. व त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व भविष्याची चिंता त्यांना राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x