11 December 2024 5:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

पुणे भीषण अपघात व नियती; पहिल्या इयत्तेपासून वर्ग मित्र; एकत्रच आयुष्याचा अंत

Accident, Vehicle Accident, Heavy Accident

पुणे : आयुष्याच्या प्रवासात नियती कोणता खेळ खेळेल ते सांगता येणे कठीण आहे आणि तसाच काहीसा प्रकार पुणे येथील भीषण अपघातात घडला आहे. पुणे-सोलापूर रोडवर झालेल्या भीषण अपघातात तब्बल ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील ८ जण यवतमधील जनविद्या विकास मंदिर या शाळेत २०१४ – १५ च्या १०वी’च्या बॅचमध्ये एकत्र शिकत होते. विशेष म्हणजे हे सर्व जण पहिल्या इयत्तेपासून जिवलग वर्ग मित्र होते.

काल सकाळी आठ वाजता ते रायगड येथे वर्षाविहारासाठी गेले होते. पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ते पुण्याकडून यवतकडे येत होते. त्यावेळी वेगामुळे अथवा चालकाला डुलकी लागल्यामुळे त्यांच्या कारने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडक दिली. त्यात त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमधील आठ जण यवत मधील तर एक जण कासुर्डी येथील आहे.

दरम्यान, या अपघातात अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महमद अब्बास दाया, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत घिगे, दत्ता गणेश यादव आणि जुबेर अजिज यांचा मृत्यू झाला आहे.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x