19 April 2024 2:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर Reliance Power share Price | अल्पावधीत 2400% परतावा देणारा रिलायन्स पॉवर शेअर होल्ड करावा की बाहेर पडावे? Samvardhana Motherson Share Price | 18 पैशाच्या शेअरची जादू! गुंतवणुकदार झाले करोडपती, पुढेही फायद्याचा स्टॉक Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला Infosys Share Price | भरवशाचे टॉप 7 शेअर्स स्वस्त झाले, पण व्हॉल्यूम लाखोमध्ये, संयम राखल्यास मिळेल मल्टिबॅगर परतावा IREDA Share Price | IREDA शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, सर्किट फिल्टरही वाढला, स्टॉक तुफान तेजीत येणार? Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, 1 वर्षात 412% परतावा देणारा 39 रुपयाचा शेअर तेजीत येणार?
x

पुणे आंबिल ओढा | भाजप सरकारची भर पावसाळ्यात गरिबांवर कठोर कारवाई | लहान मुलं, स्त्रियांकडून आक्रोश

Pune Ambil Odha Dispute

पुणे, २४ जून | बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातल्याचा आरोप करत पुण्यात स्थानिक नागरिकांनी मोठा विरोध केला. घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर आंबिल ओढ्यातील नागरिकांनी विरोध केल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. काही जणांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. आंबिल ओढ्यात 700 ते 800 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कात्रज तलावापासून आंबिल ओढ्याला सुरुवात होते. आंबिल ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेकडून ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप होत आहे. ही जागा बिल्डरच्या घशात घातली जाणार आहे, असा दावा स्थानिकांनी केला आहे. जागा बळकवण्यात लोकप्रतिनिधींचाही हात असल्याचाही आरोप केला जात आहे. पालिकेने कारवाई सुरु केल्यानंतर लहान मुलं आणि स्त्रियांकडून आक्रोश सुरु आहे.

आंबिल ओढ्यामध्ये भर टाकून अनेक ठिकाणी बांधकामं करण्यात आली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अनेक वेळा लगतच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरुन नुकसान होते. प्रशासनाकडून वारंवार नाले बुजवले जातात, पावसाचे पाणी नैसर्गिकपणे वाहून नेणारे ओहोळ बुजवले जात आहेत. त्यामुळे आंबिल ओढ्याची वहनक्षमता 60 टक्क्यांनी घटल्याची माहिती आहे.

माजी महापौर मुक्ता टिळक काय म्हणतात?
पावासाळ्यात अशी कारवाई करायची नाही हे बैठकीत ठरलं होतं, पण ही कारवाई का केली असा प्रश्न प्रशासनाला विचारण्यात आला, पण त्यांच्याकडे उत्तर नाही. त्यामागचं कारण शोधावं लागेल, जर सत्ताधारी भाजपने पावसाळ्यात कारवाई करु नये असं ठरवलं होतं, तरीही ही कारवाई का झाली, राज्य सरकारशी चर्चा करुन प्रशासनावर कारवाई करण्याबाबत विचारणा करु, असं भाजप आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या.

स्थानिक नागरिकांचा दावा काय?
भाडोत्री कामगार आणून लोकांच्या घरातील साहित्य बाहेर काढलं, पोलिसांनी विरोध करणाऱ्यांना उचलून नेलं आणि पाडकाम सुरु आहे. सध्या राजकीय नेते या कारवाईचा निषेध करत असले तरी राजकीय आदेशाशिवाय ही कारवाई होत नाही, हेच सत्य आहे असं स्थानिक नागरिक म्हणत आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Pune Ambil Odha Dispute peoples angry on BJP a ruling party news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x