13 December 2024 9:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

आ. रोहित पवार यांनी कोरोना वॉरियर्ससोबत रक्षाबंधन साजरा केला

Raksha Bandhan, MLA Rohit Pawar, Celebrated Rakshabandhan, Nurse at the hospital

पुणे, ३ ऑगस्ट : आज संपूर्ण देशभरात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीदेखील आजचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करत बहीण-भावाच्या नात्याचं एक सुंदर उदाहरण त्यांनी सगळ्यांसमोर ठेवलं आहे. रोहित पवार यांनी आज ससून आणि नायडू रुग्णालयांना भेट दिली आणि रुग्णालयातील नर्ससोबत रक्षाबंधन साजरं केलं.

आज भाऊ-बहीणीच्या पवित्र नात्याचा दिवस आहे. अशात या सणावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनामुळे आज अनेकांना रक्षाबंधन साजरं करता येणार नाही. कोरोनाच्या जीवघेण्या महामारीमुळे संपूर्ण आरोग्यव्यवस्था कामाला लागली आहे. डॉक्टर, नर्स, सफाई कामगार हे गेल्या कित्येक महिन्यांपासून काम करत आहे. त्यामुळे आपली रक्षा करणाऱ्या खऱ्या बहिणींसोबत रक्षाबंधन साजरा करण्यासाठी रोहित पवार हे आज रुग्णालयांची भेट घेत आहेत.

यावेळी सॅनिटायझर, मास्कची रोहित पवारांकडून ओवाळनी देखील कोरोना यौद्धांना देण्यात आली. कोरोना वॉरियर्सचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेन असा देखील शब्द यावेळी रोहित पवार यांनी दिला. या वेळी ससून मधील कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्याची महिला कर्मचाऱ्यांची रोहित पवार यांच्याकडे मागणी केली.

 

News English Summary: Celebrating today’s festival in a unique way, they have set a beautiful example of brother-sister relationship. Rohit Pawar visited Sassoon and Naidu hospitals today and celebrated Rakshabandhan with the nurses at the hospital.

News English Title: Raksha Bandhan MLA Rohit Pawar celebrated Rakshabandhan with a nurse at the hospital News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x