17 May 2021 6:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Cyclone Tauktae | मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर
x

सुप्रिया'ज किचन - गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक

Chef - Supriya Kavade

पाककृती - (Procedure)

 1. सर्वात प्रथम गॅस सुरू करून भांड्यामध्ये 3 वाटी पाणी, एक चिमूट मीठ आणि १ चमचा साजूक तुप घालून पाणी उकळण्यास ठेवावे.
 2. त्यानंतर पाणी उकळले की, गॅस बारीक करून त्यामध्ये 3 वाटी तांदळाचे पीठ घालून मिक्स करून झाकण ठेवून एक वाफ आणावी व थोडे वाफलले की गँस बंद करून ते थंड होण्यास ठेवावे.
 3. सारण बनवण्यासाठी गॅस सुरू करून एका नॉनस्टिक पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून गरम होऊ द्यावे त्यानंतर त्यामधे खसखस घालून परतून . त्यामधे गूळ घालून व्यवस्थित मिक्स करून गुळ वितळून घ्यावा त्यानंतर त्यामधे किसलेले ओले खोबरे वेलची पावडर व चिमूठभर मीठ घालून सारण सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतावे.४-५ मिनटात हे सारण तयार होईल. हे सारण पूर्ण थंड झाल्यावरच मोदकात भरण्यासाठी वापरावे.
 4. उकड थंड झाली की परातीमध्ये उकड काढून घ्यावी हि उकड व्यवस्थित मळून घ्यावी लागते. त्यासाठी वाटी मध्ये पाणी आणि वाटीत थोडे तुप घ्यावे. उकड मळताना तुप आणि थोडे पाणी लावून मऊसर मळून घ्यावी.
 5. उकड व्यवस्थित मळून झाली कि त्याचे सुपारीपेक्षा थोडे मोठे गोळे करून त्याची पारी तयार करावी. त्यात एक चमचाभर सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करावा. अश्याप्रकारे सर्व मोदक करून घ्यावेत.
 6. मोदक वाफवण्यासाठी गॅस सुरू करून कुकर मध्ये थोडे पाणी घालून व त्यावरती चाळणीला थोडे तेल लावून पाणी उकळण्यासाठी ठेवावे.
 7. पाणी उकळले की त्या चाळणी मध्ये जितके बसतील तितके मोदक ठेवावेत व त्यावरती झाकण ठेवून 12-15 मिनिट वाफ काढून घ्यावी. अश्याप्रकारे सर्व मोदक उकडून घ्यावेत व गॅस बंद करावा.
 8. गणपती बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवून साजूक तूप घालून गरमागरम मोदक खावेत.

टीप:

 1. आवडत असल्यास सारणात काजू-बदामाचे पातळ काप घालू शकता.
 2. हळदीच्या पानांमध्ये उकडीचे मोदक वाफवून घेतल्यास मोदकांचा स्वाद छान येतो.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

 • 3 वाटी तांदळाचे पीठ (3 cup rice flour)
 • 3 वाटी पाणी (3 cup water)
 • 2 चमचे खसखस (2 tbsp poppy seeds)
 • दीड वाटी गुळ (1 and half cup jaggery)
 • 3 वाटी किसलेले ओले खोबरे (3 cup grated wet coconut )
 • 1/2 चमचा वेलची पावडर (1/2 tbsp cardamom powder)
 • 2-3 चमचे साजूक तुप (2-3 tbsp ghee)
 • चवीनुसार मीठ (Salt to taste)

Supriya's Kitchen Recipe - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x