29 March 2024 6:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

छत्रपति संभाजी महाराज बलिदान दिन | संभाजी राजेंबद्दलच्या 'या' गोष्टी माहिती आहेत?

Chhatrapati sambhaji Maharaj Punyatithi 2021, Chhatrapati Shivaji Maharaj

मुंबई, ११ मार्च: ११ मार्च रोजी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी असते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर तब्बल 9 वर्ष स्वराज्याचा कार्यभार सांभाळला. अनेक लढाय्या जिंकल्या. मात्र त्यांचे स्वराज्यप्रती असलेले प्रेम, निष्ठा आणि शौर्य हे त्यांच्या शेवटच्या दिवसातून अधिक ठळकपणे दिसून येते. शत्रुच्या तावडीत सापडल्यानंतर अनेक हालअपेष्टा होवूनही त्यांनी शरणागती पत्करली नाही. त्यांचे हे शौर्य अजरामर झाले. म्हणून त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस बलिदान दिन म्हणूनही साजरा केला जातो. (Chhatrapati sambhaji Maharaj Punyatithi 2021 Maharashtra)

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याच्या लढाईत संभाजी महाराजांनी प्राण पणाला लावले. औरंगजेबाला तर संभाजी महाराजांनी नामोहरम करून सोडले होते. मोठ्या प्रमाणावर सैन्य आणि लवाजमा असूनही शंभुराजे औरंगजेबाच्या हातील लागत नव्हते. पण काही फितुरांनी दगा दिली आणि महाराजांना कैद झाली.

कदाचित महाराजांसमोर अशा प्रकारे फितुरांचे आव्हान नसते तर, महाराज कधीच औरंगजेबाच्या तावडीत कधीच सापडले नसते. पण फितुरांनी स्वराज्याच्या पाठीत खंजीर खुपसला आणि संभाजी महाराज औरंग्याच्या तावडीत सापडले. त्याच्या मनात संभाजी महाराजांविषयी एवढा राग होता, की त्याने संभाजी महाराजांना वेदना देऊन देऊन ठार करायचे असे ठरवले. त्यासाठी त्याने महाराजांवर अनेक प्रकारे अत्याचार केले.

वयाच्या १४ व्या वर्षी ग्रंथलेखन:
छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे सुपुत्र असल्याने रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजी राजे अभ्यासात अत्यंत हुशार होते. अनेक भाषा त्यांनी आत्मसाद केल्या होत्या. संस्कृत भाषेवर विशेष प्रभूत्व मिळवले होते. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला. याशिवाय नाईकाभेद, नखशिखा, सातसतक या ग्रथांची निर्मिती केली. संभाजी महाराजांचे सल्लागार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवी कलश यांच्याशी राजेंची मैत्री ही साहित्यामुळे अधिक घट्ट झाली, असे सांगण्यात येते. एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन इतिहास घडविणारे आणि इतिहास लिहिणारे संभाजी महाराज होते.

संभाजी महाराजांचे घोडदळ:
छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे संभाजी महाराजही केवळ गडावर बसून आहे तो राज्यकारभार करण्यातले नव्हते. शिवाजी महाराजांसारखाच संभाजी राजेंनीही शत्रूविरोधात जोरदार लढा दिला. गोव्याच्या मोहिमेप्रसंगी घोड्यावर बसून मांडवी नदी ओलांडली होती. गोव्यात जाऊन पोर्तुगीजाला असा सज्जड दम भरला होता की, पुन्हा पोर्तुगीज संभाजी राजेंच्या वाटेला गेला नाही. शिवाजी महाराजांप्रमाणे संभाजी महाराजांकडेही जातिवंत आणि राजाप्रमाणेच शूरवीर घोडे होते.

संभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ:
छत्रपती संभाजी महाराज हे राज्यकारभारातही अत्यंत निपूण होते. कुशल संघटक होते. शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांनीही अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली होती. यामध्ये पंतप्रधान म्हणून निळोपंत पिंगळे, चिटणीस म्हणून बाळाजी आवजी, सेनापती म्हणून हंबीरराव मोहिते, न्यायाधीश म्हणून प्रल्हाद निराजी, पंत सुमंत म्हणून जनार्दन पंत, पंडितराव दानाध्यक्ष म्हणून मोरेश्वर पंडितराव, पंत सचिव म्हणून आबाजी सोनदेव, पंत अमात्य म्हणून दत्ताजी पंत, पंत अमात्य म्हणून अण्णाजी दत्तो यांना नेमले होते.

अजेय योद्धा:
छत्रपती शिवाजी महाजांनंतर संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली. स्वराज्य विस्तारण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले. गनिमी काव्याचा चपखलपणे वापर करत शत्रूंना झुंजवले. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे १२० युद्धे केली. मात्र, एकाही लढाईत ते कधीही पराभूत झाले नाहीत. संभाजी राजेंची शत्रूवर चाल करून जायची पद्धत वादळी होती. संभाजी राजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. शत्रूला ते कधीही सापडले नाहीत. मात्र, स्वकीयांनी टाकलेल्या फितुरीच्या जाळ्यात संभाजी महाराज अडकले आणि कैद झाले.

बुऱ्हाणपूर आणि रामशेज:
छत्रपती शिवरायांनंतर शंभूराजे छत्रपती झाले. संभाजी महाराजांनी सरसेनापती म्हणून हंबीरराव मोहिते यांची नियुक्ती केली. सरनौबत हंबीरराव मोहिते यांनी अचानक बुऱ्हाणपूर शहरावर हल्ला केला. मोठ्या फौजफाट्यासह मराठी सैन्य ७० मैलाची मजल मारून एकाएकी बुऱ्हाणपुरावर चालून गेले. तीन दिवसापर्यंत मराठे पुरे लुटीत होते. त्यांना मुबलक लुट मिळाली. त्यांनी जडजवाहीर, सोने-नाणे, रत्ने आणि मौल्यवान सामान घेतले. इतर जिन्नसाची त्यांनी परवा केली नाही. भांडीकुंडी, काचेचे सामान, धान्य, मसाले, वापरलेली वस्त्रे इ. सर्व लुट वाहून नेणे शक्य नसल्यामुळे तेथेच टाकून दिले व नंतर ते निघून गेले. पुढील काही महिने त्या वस्तूला हात लावायची कुणाची हिंमत झाली नाही, अशी आख्यायिका आहे. शहाबुद्दीन फिरोजजंगने रामशेज किल्ल्यावर चाल करून गेला. हा किल्ला सहज हस्तगत करता येईल, अशी मोघलांचा समज होता. मात्र, संभाजी महाराजांनी या किल्ल्यावर रसद पोहोचवण्यासाठी खास तुकडी तैनात केली. मराठ्यांनी कडवी झुंज देत हा किल्ला ५ वर्षे झुंजवत ठेवला.

धार्मिक धोरणकर्ते संभाजी महाराज:
संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठीही भरपूर कामे केली. एवढेच नव्हे तर संभाजी महाराजांच्या धार्मिक धोरणांवरही छत्रपती शिवाजी महाराज यांचा ठसा कोरलेला आढळतो. समर्थ रामदास स्वामींना मिळालेल्या राममूर्तीची चाफळ येथे स्थापना करून मंदिर उभारले. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा गोसावी, मोरया गोसावी, समर्थ रामदास, सदानंद गोसावी यांना शिवाजी महाराजांनंतरही सर्वतोपरी मदत केली. यासह अनेकांना त्यांनी सढळ हस्ते मदत केल्याचे अनेक दाखले आपल्याला देता येतील.

 

News English Summary: March 11 is the death anniversary of Sambhaji Maharaj, the second Chhatrapati of Hindavi Swarajya. After the death of Shivaji Maharaj, he took charge of Swarajya for 9 years. Won many battles. But his love, devotion and bravery towards his self-government is more evident from his last days. He did not surrender in spite of many hardships after being caught by the enemy. His bravery became immortal. Therefore, his death anniversary is also celebrated as Sacrifice Day.

News English Title: Chhatrapati Sambhaji Maharaj Punyatithi 2021 Maharashtra news updates.

हॅशटॅग्स

#ChhatrapatiSambhajiMaharaj(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x