29 March 2024 1:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला
x

गावाकडली खुशखबर | महामंडळाकडून बियाणे परमिट वाटप सुरु | जाणून घ्या कसं मिळवाल

मुंबई, १५ जून | बियाणे परमिट वाटप सुरु झालेले आहे या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेवूयात. बियाणे अनुदान योजनेचा ऑनलाईन अर्ज भरला होता त्यांना कृषी विभागाकडून बियाणे परमिट वाटप करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झालेले आहे. बियाणे खरेदी करण्याचा परमिट कसे असते, कोणकोणत्या बियाण्यांसाठी हे परमिट वाटप सुरु झालेले आहे, कोणत्या बियाण्यासाठी शेतकऱ्याला किती रक्कम भरावी लागणार आहे. हे परमिट किती दिवस चालते, तुम्हालाही असे परमिट मिळाले असेल तर पुढील प्रक्रिया काय करावी याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

बियाणे योजनेसाठी अनेक शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज:
मित्रानो तुम्हाला माहितच आहे कि महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर शेती संबधी विविध शासकीय योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्यात आलेले होते. महाडीबीटी या वेबसाईटवर भरण्यात आलेल्या योजनेपैकी बियाणे अनुदान योजना अंतर्गत बऱ्याच शेतकरी बांधवानी त्यांचे बियाणे अनुदान ऑनलाईन अर्ज भरले होते. ज्या शेतकरी बांधवानी बियाणे योजनेसाठी महाडीबीटी या शेतकरी पोर्टलवर अर्ज भरले होते त्यांच्या मोबाईलवरवर संदेश आले होते कि तुमची बियाणे योजनेसाठी निवड झालेली आहे.

जाणून घ्या बियाणे परमिट कसे असते:
ज्या शेतकरी बांधवांची बियाणे अनुदान योजनेसाठी निवड करण्यात आलेली होती त्यांना कृषी बिभागामार्फत शेतकर्यांनी केलेल्या अर्जानुसार बियाण्यांचा लाभ मिळण्यासाठी परमिट वाटप करण्यात येत आहेत. हे परमिट कसे असते कोणकोणत्या बियाण्यांसाठी हे परमिट दिले जाते हे हे आपण या ठिकाणी बघुयात.

बियाणे परमिट घेण्यासाठी खालील कागदपत्रे सोबत ठेवा:
ज्या शेतकऱ्यांची बियाणे अनुदान योजनेसाठी निवड झालेली आहे त्यांनी कृषी कार्यालयात जावून परवाने घेणे अपेक्षित आहे अर्थात याला काही ठिकाणी अपवाद असू शकतात. काही ठिकाणी हे परमिट गावात जावून देखील शेतकऱ्यांना वाटप केलेलं जातात. शेतकऱ्यांनी बियाणे परमीट घ्यायला जाताना आपले आधार कार्ड आपल्या सोबत असू द्यावे. कोणत्या गट नंबरमध्ये किती क्षेत्रासाठी बियाणे अनुदानासाठी अर्ज केलेला आहे हि माहिती असू द्यावी अर्थात हि माहिती अधिकारी साहेबांकडे असतेच पण आपल्याकडे हि माहिती असली कि अधिक सोयीस्कर होईल.

बियाणे परमिट संदर्भातील महत्वाच्या बाबी:
कृषी विभाग भारत सरकार/महाराष्ट्र शासन तथा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला मार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान भरडधान्य/ कडधान्यवाटप अंतर्गत हा परवाना देण्यात येत आहे. सदरील बियाणे परवाना २०२१ ते २०२२ साठी देण्यात आलेला आहे. सदरील बियाणे परमिट दिलेल्या तारखेपासून फक्त तीन दिवस वैद्य असते त्यामुळे जर तुम्हाला बियाणे परमिट मिळालेले असेल तर लवकरात लवकर सुचविलेल्या दुकानमधून बियाणे खरेदी करावीत.

जाणून घ्या कृषी विभागाच्या बियाणे परमिटवर कोणकोणत्या बाबी दिलेल्या असतात:
या परमिटवर परवाना क्रमांक असतो, पुस्तक क्रमांक असतो त्याच प्रमाणे उजव्या बाजूला ज्या दिवशी बियाणे परमिट दिलेल्याची तारीख असते. ज्या ठिकाणी तुम्हाला बियाणे मिळणार आहे त्या केंद्राचे नाव दिलेले असते. शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत दिलेल्या केंद्रावरजावूनच हे बियाणे खरेदी करावेत. शेतकऱ्याचे नाव, गाव आणि तालुका त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हि सर्व माहिती या ठिकाणी दिलेली असते. लाभार्थी मंजूर क्षेत्र, सर्व्हे नंबर हि सर्व माहिती या ठिकाणी दिलेली असते.

बियाणे परमिटमध्ये दिलेल्या बियाण्यांची पॅकिंग साईज:
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत जे बियाणे शेतकरी बांधवांना मिळणार आहे त्या बियाण्याचे वान या ठिकाणी दिलेले असते. बियाण्यांच्या वाणानुसार बियाणे पॅकिंग साईज वेगवेगळी असते जसे कि मका पिक असेल तर पॅकिंग साईज ४ किलोची असते. तुरीचे बियाणे असेल तर पॅकिंग हि २ किलोची असते. उडीद बियाण्यांची पॅकिंग साईज २ आणि ५ किलोमध्ये असते.

बियाणे परमिटमध्ये दिलेल्या बियाण्यांचे दर:
बियाण्यांची पॅकिंग साईज आपण बघितली आता या बियाण्यांचा दर किती असणार आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेवूयात. बियाणे परमिट मध्ये मका या बियाण्यांचा पंधरा हजार रुपये प्रती क्विंटल आहे तर तूर बियाण्यांचा दर तेरा हजार रुपये प्रती क्विंटल देण्यात आलेला आहे. उडीद या वाणांचा १० वर्षाआतील दर पंधरा हजार ते पंधरा हजार पाचशे रुपये आहेत तर दहा वर्षावरील वाणांचा दर चौदा हजार ते चौदा हजार पाचशे आहे.

विविध पिकांच्या बियाण्यांचे विविध अनुदान दर:
बियाणे अनुदान विषयी जाणून घेवूयात. बियाणे अनुदान जे दिले जाणार आहे त्याचे दर सुद्धा प्रती क्विंटलमध्ये आहे. मका बियाण्यांसाठी अनुदान दर ७५०० तर लाभार्थी शेतकरी अनुदानित दर ७५०० आहे. तूर बियाणे साठी अनुदान दर ५००० तर लाभार्थी शेतकरी अनुदानित दर ८००० रुपये आहे. उडीद बियाण्यांसाठी अनुदान दर ५००० तर लाभार्थी शेतकरी अनुदानित दर हा १०००० ते १०५०० आहे. उडीद बियाण्यांचा अनुदान दर २५०० तर लाभार्थी शेतकरी अनुदानित दर ११५०० ते १२०००.

मका बियाण्यांच्या एका पिशवीसाठी ३०० रुपये भरावे लागणार:
अशाप्रकारे हि बियाणे मिळणार आहे. बियाणे परमिट मध्ये दिलेल्या टेबलच्या खाली एक ओळ दिलेली आहे ती अशी आहे कि बियाण्याचे अनुदान वजा करून उर्वरित रक्कम वसुली करावी व पूर्णपणे बियाणे लाभार्थ्यास देण्यात यावे. शेतकरी बंधुंनो मका बियाण्याचा आपण विचार केला तर ४ किलोच्या पॅकिंगसाठी ३०० शेतकऱ्याला दुकानदाराला द्यावे लागणार आहे. शेतकरी बंधुनो तुम्हाला असे बियाणे परमिट मिळाले असेल तर तर त्यावर उल्लेख केलेल्या बियाणे वाटप केलेल्या केंद्रावर जावून तुमचे बियाणे खरेदी करून घ्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Maharashtra Biyane Mahamandal Biyane permit online news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x