20 April 2024 6:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

पोलिसांकडून वर्तणूक व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (Police Verification) ऑनलाईन | असा ऑनलाईन अर्ज करा

Online character certificate in Marathi

मुंबई, ०६ जुलै | नोकरभरती तसेच विविध कामांनिमित्ताने लागणाऱ्या चारित्र्य पडताळणीच्या दाखल्याकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा सुरु झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. परंतु आजही अनेकांना याबद्दल माहिती नसल्याने निरर्थक त्रास सहन करत असतात. निमशासकीय, खाजगी संस्था इ.मध्ये नोकरीकरिता वर्तणूक व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देणे अत्यंत गरजेचे असते.

काय होती जुनी पद्धत ?
चारित्र्य प्रमाणपत्रासाठी आयुक्तालयाकडे अर्ज करून १०० रुपयांचा डीडी जमा करावा लागत होता. त्यानंतर कागदपत्रांचे टपाल संबंधित ठाण्यात जाऊन विशेष शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून अर्जदाराची चौकशी केली जात होती. पुन्हा ते टपाल आयुक्तालयात येत असे आणि नंतर संबंधित नागरिकाला प्रमाणपत्र मिळत असे. मात्र आता नोकरी तथा इतरही विविध कामांसाठी पोलिसांकडून लागणारे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन मिळतं.

चारित्र्य पडताळणी दाखला मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?
चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मुख्यत्वे ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा ,वयाचा पुरावा आणि आपण चारित्र्य पडताळणी जिथे सादर करावयाची आहे. तेथील चारित्र्य पडताळणी मागणीचा पत्र मुख्य कागदपत्रे लागतात.

कागदपत्रांची यादी आपण खालच्या प्रमाणे जोडता येतील.

ओळखीचा पुरावा:
1) आधार कार्ड.
2) ड्रायव्हिंग लायसन्स.
3) मतदान कार्ड.
4) पॅन कार्ड.
5) विद्यार्थ्यांची ओळख पत्र
6) पासपोर्ट. आणि इतर.

ओळखीच्या पुराव्यासाठी किमान एक कागदपत्र जोडणे अनिवार्य आहे.

पत्त्याचा पुरावा.
1) रेशन कार्ड.
2) लाईट बिल.
3) फोन बिल.
4) भाडे करार.
5) पासपोर्ट.
6) आधार कार्ड.

पत्त्याच्या पुराव्यासाठी किमान हे कागदपत्र जोडणे अनिवार्य आहे.
वयाचा पुरावा:
1) जन्मदाखला.
2) बोर्ड सर्टिफिकेट.
3) शाळा सोडलेला दाखला. आणि इतर.

वयाच्या पुराव्यासाठी किमान एक कागद पत्र जोडणे गरजेचे आहे.
इतर कागदपत्रे:
1) अर्जदाराचे फोटो.
2) अर्जदाराचे सही.
3) कंपनी लेटर.
4) पोलीस अधीक्षक यांना अर्ज.

इतर कागदपत्र मधील फोटो सही आणि कंपनी लेटर किंवा पोलिस अधीक्षक यांना अर्ज जोडणे गरजेचे आहे.

चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रास मंजुरी कशी मिळते?
चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर सदर अर्ज आपल्या लोकल पोलीस स्टेशन मध्ये ते जाते. त्या ठिकाणी अर्जदाराने भरलेला फॉर्म त्याला जोडलेले कागदपत्रे याची पडताळणी केली जाते. आणि तसेच सदर इसमावर काही गुन्हा दाखल झाले आहेत की नाही याची शहानिशा केली जाते त्यानंतर सदर अर्ज संबंधित पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात जाते. त्यानंतर आपल्या अर्जाची त्या ठिकाणी पुनर पडताळणी होऊन सर्व योग्य असल्यास आपल्या अर्जास मंजुरी मिळते आणि आपल्याला चारित्र्य पडताळणी दाखला मिळते.

चारित्र्य पडताळणी दाखला केव्हा मिळत नाही व का मिळत नाही?
अर्जदाराने चारित्र्य पडताळणी प्रमाण पत्रासाठी ज्यावेळी अर्ज करतात त्यावेळी अर्जामध्ये योग्य माहिती भरावी लागते. फॉर्म भरताना काही चुका झाल्यास किंवा चुकीची कागदपत्रे सोडल्यास अशावेळी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हा मिळत नाही.

पूर्वी चारित्र्याचा दाखला मिळवण्यासाठी पोलिसांच्या तीन ते चार वेबसाइटवरुन फॉर्म भरून त्यांची प्रिंट काढावी लागत होती. त्यानंतर मिळालेल्या तारखेला विशेष शाखा येथे जाऊन फॉर्म आण‌ि कागदपत्रे जमा करणे सक्तीचे होते. त्यानंतर ३ ते ४ दिवस संबंधित पोलिस ठाण्यात चारित्र्य पडताळणीच्या अहवालासाठी उपस्थित राहावे लागत असे. त्यानंतर ३० दिवसांनी नागरिकांना चारित्र्याचा दाखला मिळत होता. मात्र पोलिसांच्या विशेष शाखा १ ने www.pcsmahaonline.gov.inwww.aaplesarkar.mahaonline.gov.in ही नवीन संकेतस्थळे सुरू केली आहेत.

नवीन प्रक्रियेतील टप्पे:
* वरील दोन संकेतस्थळांवर अर्जदाराने माहिती भरावी
* संबंधित पोलिस ठाण्यात चारित्र्य पडताळणीकरता उपस्थित रहावे
* संबंधित पोलिस ठाण्याकडून चारित्र्य पडताळणी अहवाल ऑनलाइन अपलोड
* अहवालासंदर्भात पडताळणी करून अर्जदाराचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र डिजिटल सहीद्वारे तयार
* प्रमाणपत्र तयार झाल्याचा अर्जदारास मेसेज

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Online character certificate in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x