29 March 2024 5:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

खुशखबर | सोलर पावर प्लांट उभारायचा आहे? | तालुका तपासा आणि असा करा अर्ज

Solar Power plant

मुंबई, १३ जून | शेतकरी बंधुंनो आजच्या लेखामध्ये सोलर पावर प्लांट संबधी माहिती जाणून घेवूयात. महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये एनटीपीसी विद्युत व्यापार निगम लिमिटेडच्या वतीने सोलर पावर प्लांट प्रोजेक्ट उभारण्यासंदर्भात अर्ज मागविण्यात आले आहेत. दैनिक लोकमतमध्ये या संदर्भातील जाहिरात देण्यात आलेली आहे ती जाहिरात डाउनलोड करण्याची लिंक या लेखाच्या सर्वात खाली देण्यात आलेली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १७ जून २०२१ आहे. तुमच्या तालुक्यामध्ये कोणत्या ठिकाणी हे सोलर पावर प्लांट प्रोजेक्ट उभारले जाणार आहेत त्याची देखील तुम्ही माहिती घेऊ शकता त्या संदर्भातील माहिती (PDF File) सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे ती तुम्ही डाउनलोड करून शकता.

सोलर पावर प्लांट उभारण्यासंदर्भातील जाहिरात जाणून घेवूयात:
दिनांक ८ जून २०२१ च्या दैनिक लोकमत वृत्तपत्रामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सोलर पॉवर प्लँट्सची उभारणी करण्याकरिता जमीन लीज/खरेदी करण्याकरिता स्वारस्य अभिव्यक्ती या मथळ्याखाली एक जाहिरात देण्यात आलेली आहे. सदरील दैनिक लोकमत मधील हि जाहिरात तुम्हाला हवी असेल तर खालील जाहिरात डाउनलोड करा या बटनावर क्लिक करून तुम्ही हि जाहिरात बघू शकता.

जाहिरात येथे क्लिक करून डाउनलोड करू शकता.

सोलर पावर प्लांट अर्ज प्रक्रिया:
एनव्हीव्हीएन महाराष्ट्र राज्यामध्ये सोलर पावर प्लांट उभारणी करता जमीन भाडेतत्त्वावर घेण्यासाठी किंवा जमीन खरेदी करता इच्छुक पार्टीकडून स्वारस्य अभिव्यक्ती ई. ओ. आय. EOI (Expression of interest) मागवीत आहे. इच्छुक पर्तींनी त्यांचे अर्ज https://eprocurentpc.nic.in/ किंवा एनव्हीव्हीएन वेबसाईट http://nvvn.co.in/ वर उपलब्ध विस्तृत ईओआय नुसार आपले अर्ज सादर करावेत. ज्या व्यक्ती पात्र आहेत त्यांनी विस्तृत ईओआयच्या जोडपत्रानुसार आपले अर्ज केवळ इमेलद्वारे सॉफ्ट कॉपीमध्ये १७ जून २०२१ पर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इमेलचा पत्ता जाहिरातीमध्ये दिलेला आहे.

महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा.
७ जून २०२१ रोजी ईओआय उघडण्यात आलेला आहे. ११ जून २०२१ ला स्पष्टीकरण किंवा विचारणा करण्याची शेवटची तारीख होती तर १७ जून २०२१ ला अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आणि याच दिवशी अर्ज सुद्धा उघडले जातील.

जाणून घ्या तुमच्या तालुक्यात कोणत्या ठिकाणी उभारला जाणार हा सोलर पावर प्रोजेक्ट:
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये सोलर पावर प्लांट प्रोजेक्ट उभारले जाणार आहेत. तुम्हाला हि जाणून घ्यावयाचे असेल कि सोलर प्लांट प्रोजेक्ट तुमच्या तालुक्यात नेमक्या कोणत्या ठिकाणी उभारला जाणार आहे तर त्या संदर्भातील pdf फाईल डाउनलोड करून घ्या त्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

तालुक्यातील नेमकं ठिकाण समजून घेण्यासाठी येथे क्लिक करा:

 

News Title: Taluka wise Solar Power plant by NTPC in Rural Maharashtra news updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x