19 April 2024 1:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर Reliance Power share Price | अल्पावधीत 2400% परतावा देणारा रिलायन्स पॉवर शेअर होल्ड करावा की बाहेर पडावे? Samvardhana Motherson Share Price | 18 पैशाच्या शेअरची जादू! गुंतवणुकदार झाले करोडपती, पुढेही फायद्याचा स्टॉक Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला Infosys Share Price | भरवशाचे टॉप 7 शेअर्स स्वस्त झाले, पण व्हॉल्यूम लाखोमध्ये, संयम राखल्यास मिळेल मल्टिबॅगर परतावा IREDA Share Price | IREDA शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, सर्किट फिल्टरही वाढला, स्टॉक तुफान तेजीत येणार? Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, 1 वर्षात 412% परतावा देणारा 39 रुपयाचा शेअर तेजीत येणार?
x

दिवाळीपर्यंत मोफत अन्नधान्य योजनेवर केंद्राकडून शिक्कामोर्तब | कसा घ्याल योजनेचा लाभ? - वाचा

India free food grains scheme

मुंबई, २४ जून | कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्याने दिवाळीपर्यंत मोफत अन्नधान्याचे योजना राबवली जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच केली होती. या योजनेवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत पुढील नोव्हेंबर महिन्यापर्यंत मोफत अन्नधान्य देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. मोफत अन्नधान्य वाटपाच्या योजनेचा देशभरातील 81 कोटी 35 लाख लोकांना लाभ होणार आहे. दरमहा प्रति व्यक्ती पाच किलो धान्य योजनेअंतर्गत दिले जाईल. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजनेसाठी पात्र असलेल्या लोकांना योजनेनुसार पुढील पाच महिने मोफत धान्य मिळणार आहे.

योजना राबवण्यासाठी 67 हजार 266 कोटी रुपयांचा खर्च येणार असून तेवढा भारत सरकारच्या तिजोरीवर पडेल. जागतिक योग दिवसापासून म्हणजेच 21 जून पासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना केंद्र सरकारकडून कोरोना वरील मोफत दिली जाणार असल्याची तसेच पाच महिलांसाठी मोफत अन्नधान्य दिले जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात जून रोजी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात वेळी केली होती. कोरोनाचे संकट अद्याप कायम आहे अशा स्थितीत गोरगरिबांची आबाळ होऊ नये याकरिता दिवाळीपर्यंत पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत मोफत अन्नधान्य वाटपाच्या योजनेला मुदतवाढ देण्यात आली असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं होतं.

कसा घ्याल या योजनेचा लाभ ?

* तुम्हालाही सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला कोणत्याही बँकेत आपले खाते उघडले पाहिजे.
* पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरणे आवश्यक आहे.
* या फॉर्मच्या माध्यमातून आपल्याकडे किती संपत्ती आहे हे सरकारला कळते.
* यानंतर, आपण खेड्यात राहत असल्यास आपल्याला ग्रामपंचायतीत जाऊन आपले नाव नोंदवावे लागेल.
* आपण शहरात रहात असल्यास आपल्याला पालिकेत जाऊन संपर्क साधावा लागेल.
* या योजनेत गरीब विभागातील लोक रेशनकार्डशिवायही मोफत धान्य घेऊ शकतात.
* याअंतर्गत गरजू लोकांना आधार कार्डमधूनच रेशन मिळते. तथापि, याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या योजनेंतर्गत तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून नोंदणी करावी लागेल.
* नोंदणीनंतर तुम्हाला एक स्लिप दिली जाते. ही स्लिप दाखवून देखील तुम्हाला मोफत धान्य मिळू शकते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Union seals free food grains scheme till Diwali see how to take advantage of the plan news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x