20 April 2024 6:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Special Recipe | खमंग आणि रुचकर एग कबाब स्टार्टर म्हणून नक्की बनवा

Egg Kabab recipe in Marathi

मुंबई, ०७ ऑगस्ट | आपल्या आजूबाजूला अनेकांना जेवणाव्यतिरिक्त चटपटा खायला खूप आवडते. शाळा, महाविद्यालय आणि ऑफिसमधून घरी जाताना काही तरी खाण्याची इच्छा होते. त्यावेळी ज्याला जे आवडेल त्यांनी ते ते डिश खाण्यास पसंती देतात. त्यातील एक डिश म्हणजे एग कबाब तुम्हाला जर बाहेरच्यासारखी घरच्या घरी एग कबाब बनवायची असेल तर एक ट्रिक जाणून घ्याच.

साहित्य :
* 2 उकडलेली अंडी
* 1 उकडलेला बटाटा
* 1/2 कांदा
* 2-3 टेबलस्पून कोथिंबीर चिरलेली
* 1 टीस्पून लाल तिखट
* 1 टीस्पून मीठ
* 1/4 टीस्पून हळद
* 1 टीस्पून मटण / मीट मसाला
* 1/2 टीस्पून काळीमिरी पूड
* 1/2 टीस्पून पुदिन्याची पूड
* धने – जीरे पावडर, चाट मसाला, हिरवी मिरची हे ही घालू शकता
* 2 टेबलस्पून मैदा
* 1/4 कप पाणी
* 2-3 ब्रेड स्लाईसचे ब्रेड क्रम्स
* तेल

कृती :
१. उकडलेला बटाटा व अंडी किसून घेणे.
२. कांदा, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावेत.
३. एका वाटी मध्ये किसलेले अंडे व बटाटा, कांदा, कोथिंबीर, मीठ, सर्व मसाले घालून मिक्स करून घेणे.त्या पिठाचे समान भाग करून घ्यावेत.
४.एक गोळा घेऊन हाताला तेल लावून घ्यावे व गोळ्याला गोलाकार, चपटा आकार देऊन घेणे. असे सर्व कबाब किंवा टिक्की करून घेणे.
५. एका वाटी मध्ये मैदा व पाणी थोडे थोडे घालून पेस्ट तयार करून घेणे. त्या पेस्ट मध्ये एक कबाब बुडवून घेणे.
६. मग ते ब्रेड क्रम्स मधे घोळवून घेणे. सर्व कबाब या प्रमाणे तयार घेणे.**तळून ही घेऊ शकता किंवा शॅलो फ्राय करून घेऊ शकता
७. गॅसवर पॅन गरम करत ठेवावा. त्यात थोडे तेल घालून पसरवून घेणे. गॅस मध्यम आचेवर ठेवून कबाब दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय करून घेणे. खाण्यासाठी तयार कबाब किंवा टिक्की.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Egg Kabab recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x