25 April 2024 7:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Special Recipe | झणझणीत खानदेशी शेव भाजी बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी

Khandeshi Shev Bhaji recipe

मुंबई, २४ जुलै | एखाद्या झणझणीत पदार्थाची डिश घरात अनेकांना आवडत असते. त्यात राज्यातील एखाद्या भागातील प्रसिद्ध अशी डिश म्हटल्यावर सर्वांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. त्यात जर ती डिश झणझणीत खानदेश शेव भाजीची असेल तर बातच निराळी म्हणावी लागेल. चला तर आज हटके डिश झणझणीत खानदेश शेव भाजी बनवूया…

संपूर्ण साहित्य:
* 1 वाटी शेव
* 2 कांदे
* ५-६ लसूण पाकळ्या
* २ आले चे तुकडे
* ५-६ सुके खोबरे च्या तुकडे
* ७-८ कढीपत्त्याची पाने
* 1 टीस्पून लाल तिखट
* १/८ टीस्पून हळद
* 1/4 टीस्पून जीरे
* १/४ टीस्पून मोहरी
* १/८ टीस्पून गरम मसाला किंवा काळा मसाला
* १/८ टीस्पून धणे पूड
* 1 चिमूट हिंग
* बारीक चिरलेली कोथिंबीर
* २ टेबलस्पून तेल कमी जास्त करु शकतो
* चवीनुसार मीठ घालावे

संपूर्ण कृती:
१. प्रथम आपण कांदे चिरून घ्यावे मग एक कढ ईमधे तेल घालून त्यात कांदे,सुके खोबरे, लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडे, हे सर्व मिश्रण तेल मध्ये भिजून घ्यावे मग मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे

२. कढई मध्ये तेल घालून त्यात कढीपत्त्याची पाने, हिंग, जीरे, मोहरी घालून फोडणी तडतडल्यावर त्यात बारीक वाटून घेतले मसाला घालून परतावे मग त्यात धणे पूड, लाल तिखट, हळद, गरम मसाला, आणि चवीनुसार मीठ घालावे व थोड्या वेळ परतून झाल्यावर त्यात गरम पाणी घालावे

३. रस उकळून घ्यावे नंतर त्यात शेव घालून गॅस बंद करावा आपली झणझणीत खान्देशी शेवभाजी तयार आहे एक वाटी मध्ये काढून वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे मस्त

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Khandeshi Shev Bhaji recipe in Marathi news updates.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा: Click Here to Download

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x