16 April 2024 1:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ambuja Cement Share Price | अदानी ग्रुपचा सिमेंट शेअर! कंपनीने नवीन अपडेट दिली, शेअर 35 टक्के वाढणार Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सची ट्रेडिंग रेंज 20-30 रुपये मध्ये अडकली, सकारात्मक बातमीनंतर तज्ज्ञांनी काय म्हटलं? IREDA Share Price | IREDA शेअर्स 30 टक्क्यांची उसळी घेणार? तज्ज्ञांनी जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस Vodafone Idea Share Price | एका वर्षात 113% परतावा देणारा 12 रुपयाचा शेअर कोसळणार? तज्ज्ञांचा इशारा काय? Adani Power Share Price | अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा दबावाखाली? शेअरमध्ये जबरदस्त अस्थिरता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, हे टॉप 3 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढेल Suzlon Share Price | 1 वर्षात 416% परतावा देणारा शेअर तेजीत येणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Special Recipe | नाश्त्याला पोहे रवा थालीपीठ बनवा आणि सगळ्यांची मन जिंका - पहा रेसिपी

Poha Rava Thalipeeth recipe

मुंबई , ०७ ऑगस्ट | कांदापोहे, रवा उपमा आपण नेहमीच खातो पण कधी कधी तेच तेच खाऊन कंटाळा येतो म्हणून त्याच साहित्यापासून काहीतरी वेगळा पदार्थ बनवू शकतो तो म्हणजे पोहे रवा थालीपीठ. अत्यंत खमंग असे थालीपीठ आपल्याला नक्कीच आवडेल, म्हणून त्याचे साहित्य आणि पाककृती पहा;

साहित्य:
* 1 कप जाडे पोहे
* 1/2 कप रवा (जाडा/बारीक)
* 1/2 कप दही
* 1 कांदा चिरलेला
* 1 टेबलस्पून टोमॅटो चिरलेला
* 2 टेबलस्पून गाजर
* 2 टेबलस्पून सिमला मिरची
* 2-3 हिरव्या मिरच्या चिरलेल्या
* 1 टीस्पून जीरे
* 1/2 टीस्पून तिखट
* 1/4 टीस्पून हळद
* 1/2 टीस्पून गरम मसाला
* चवीनुसार मीठ
* कोथिंबीर
* तेल

कृती:
१. बाउलमध्ये पोहे घेऊन धुवून पाणी निथळून घ्या. त्यात रवा, दही टाका.

२. त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची व गाजर किसलेलं, सिमला मिरची बारीक चिरून घाला. तिखट, हळद, गरम मसाला, जीरे, मीठ, कोथिंबीर टाकून मिक्स करा. थोडंस पाणी टाकून सैलसर भिजवा.

३.पॅन गरम करून तेल टाका. तेल गरम झाले की हाताने किंवा चमच्याने मिश्रण पसरून छोटी छोटी थालीपीठ घाला. दोन्ही बाजूनी खरपूस लालसर होईपर्यंत भाजा. गरमागरम पोहा, रवा थालीपीठ टोमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा लोणच्याबरोबर सर्व्ह करा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Poha Rava Thalipeeth recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x