29 March 2024 2:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार?
x

मुंबई मॅरेथॉन: केनियाचा कॉसमस लॅगट मुंबई मॅरेथॉनचा विजेता

मुंबई : मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदाच्या वर्षातही केनिया तसेच इथियोपियाच्या धावपटूंनी स्पर्धेवर वर्चस्व गाजवलं. केनियाच्या कॉसमस लॅगटने पुरुष गटात मुख्य स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. तर महिला गटात इथिओपियाच्या वोर्केंश अलेमूने पहिला क्रमांक पटकावला. तर दुसरीकडे पूर्ण मॅरेथॉनच्या भारतीय खेळाडूंच्या गटात पुरुषांमध्ये नितेंद्रसिंह रावतने प्रथम तर सुधा सिंहने महिलांच्या गटात प्रथम स्थान मिळवलं आहे. पुरुषांमध्ये गोपी टी. ने द्वितीय क्रमांक तर करणसिंहने तिसरा क्रमांक मिळवला.

दुसरीकडे मुंबई मॅरेथॉनच्या २१ किमी’च्या हाफ मॅरेथॉन प्रकारात पुरुष गटात श्रीनू मुगाता आणि महिला गटात मीनू प्रजापती यांनी बाजी मारली आहे. दरम्यान, हाफ मॅरेथॉन प्रकारात महाराष्ट्राच्या कालिदास हिरवेला तिसरं तर महिलांमध्ये महाराष्ट्राच्या साईगीता नाईकने द्वितीय स्थान पटकावलं.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x