19 April 2024 10:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BYD Atto 3 | खुशखबर! आता BYD Atto 3 ई-कारला नो वेटिंग, झटपट डिलिव्हरी मिळणार, प्राईससह फीचर्स जाणून घ्या ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! महिना 10,000 रुपयांच्या SIP ने मिळेल 78.32 लाख रुपये परतावा, स्कीम लक्षात ठेवा Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Stock Market | शेअर मार्केट मधून पैसे कमावण्याचे ६ मार्ग - नक्की वाचा

 Earn money from the share market

मुंबई, २४ ऑगस्ट | शेअरच्या किमती वाढल्यावर आपल्याला नफा होत असतो हे आपणास ठाऊक आहे परंतु या व्यतिरिक्त अजूनही बरेच मार्ग आहेत ज्यातून आपल्याला नफा होऊ शकतो. तर ते कोणते मार्ग आहेत याची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत, चला तर मग सुरू करूया.

How to earn money from the share market in Marathi :

1. शेअरच्या किमती वाढणे – CAPITAL APPRECIATION
शेअर मार्केट मध्ये पैसे कमावण्याचे सर्वात लोकप्रिय साधन म्हणजे CAPITAL APPRECIATION. आपण एखादा शेअर खरेदी केल्यावर काही काळानंतर आपल्याला नफा झाल्यावर तो शेअर विकत असतो व त्यातून नफा कमावतो, मूळ खरेदी किमतीपेक्षा शेअर कितीने वाढला आहे किंवा किती नफा मिळाला आहे त्याला CAPITAL APPRECIATION असे म्हणतात.

या माध्यमातून पैसे कमावण्यासाठी आपल्याला शेअर खरेदी केल्यावर अधिक काळासाठी आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये होल्ड करणे गरजेचे असते.दिग्गज शेअर मार्केट इन्व्हेस्टर जसे की वॉरेन बफेट,राकेश झुणझुणवाला, विजय केडीया,राधाकिशन दमानी यांनी याच प्रकारातून शेअर मार्केटमध्ये करोडो रुपयांचा नफा कमावला आहे.

उदाहरणार्थ, MRF कंपनीचा शेअर 2000 साली 2500 रुपयांना मिळत होता आणि सध्या MRF चा भाव 80000 रुपये च्या वर आहे.याठिकाणी मिळणारा नफा हा कितीतरी पटीने अधिक आहे यालाच CAPITAL APPRECIATION असे म्हणतात.

2. IPO – आईपीओ
IPO मार्केट हे भारतामध्ये एखाद्या उत्सवाप्रमाणे असते.अनेक लोक , नवीन येणाऱ्या कंपन्यांचे शेअर घेण्यास उत्सुक असतात.IPO म्हणजेच कोणतीही कंपनी जेंव्हा पहिल्यांदा आपले शेअर हे बाजारात विक्रीसाठी खुले करते त्याला IPO असे म्हणतात.

आयपीओच्या वेळी कंपनीची शेअर्सची किंमत बर्‍याचदा कमी असते,पण कंपनी जेंव्हा शेअर बाजारात लिस्ट होते तेंव्हा लोकांच्या मागणीनुसार त्या कंपनीच्या शेअर्सची किंमत खूप वाढते आणि यामुळे गुंतवणुकदारांना खूप फायदा होतो.

आयआरसीटीसी (IRCTC ) या रेलवे तिकीट बुकिंग करणाऱ्या कंपनीचा आयपीओ सप्टेंबर 2019 मध्ये आला होता, ज्यामध्ये आयआरसीटीसीच्या एका समभागाची किंमत 315 ते 320 रुपये ठेवण्यात आली होती .आणि जेंव्हा कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाली त्या वेळेस एक शेअरची किंमत 500 रुपये झाली होती,आणि सध्या आयआरसीटीसी शेअरची किंमत 2000+ रुपयांवर पोहोचली आहे.

How to make big money in stock trading in Marathi :

3. डिव्हिडंड – Dividend
डिव्हिडंड म्हणजे कंपनीच्या नफ्यातुन आपल्या शेअरहोल्डर यांना दिला जाणारा मोबदला होय.कंपनी ही वर्षातून एकदा किंवा दर चारमहिन्यांना डिव्हिडंड जाहीर करत असतात.अनेक लोक डिव्हिडंड च्या माध्यमातून भरपूर पैसे कमवतात.

समजा, जर तुमच्याकडे इन्फोसिस या कंपनीचे शेअर्स असतील तर तुम्ही इन्फोसिस कंपनीत समभागधारक व्हाल आणि जर इन्फोसिस ने प्रति समभाग 10 रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतला आणि तुमच्याकडे इन्फोसिस कंपनीचे 100 शेअर असतील तर तुम्हाला 1000 रुपये रुपये लाभांश म्हणून मिळेल.

4. शेअर Buyback :
शेअर बायबॅक म्हणजे विद्यमान शेअर धारकांकडून कंपनीचे शेअर पुन्हा विकत घेणे होय.यासाठी कंपनी सद्या मार्केटमध्ये चालू असलेल्या शेअरच्या किमतीपेक्षा अधिक भाव देण्यास तयात होतात.

समजा XYZ लिमिटेड या कंपनीने बायबॅक जाहीर केला आणि प्रति शेअर बायबॅक किंमत ही 100 रुपये ठेवली आणि बायबॅक ऑफरच्या तारखेला जर XYZ लिमिटेडची शेअर किंमत 80 रुपये असेल तर बायबॅक प्रीमियम (100 रु – 80 रु) म्हणजेच 20 रुपये असेल .

TCS ,विप्रो या कंपन्या ने 2020 मध्ये buyback जाहीर केला होता. Buyback मध्ये आपणास मूळ शेअरच्या किमतीपेक्षा अधिकचा भाव आपणास मिळत असतो.

5. बोनस शेअर – Bonus Stock
बोनस शेअर ही कंपनीने आपल्या शेअरधारकांना दिलेली फ्री भेट असते.बोनस शेअर्स हे अतिरिक्त दिलेले शेअर्स आहेत जे कंपनी आपल्या विद्यमान शेअरधारकांना त्यांच्या मालकीच्या शेअरच्या प्रमाणात देतात. बोनस शेअर हे १:१ बोनस,२:१ बोनस,१:२ बोनस,३:१ बोनस या प्रमाणात जाहीर केले जातात .

कंपनीकडे असलेल्या एकूण नफ्यातून (रिझर्व्ह्‌ज फंडातून ) असे बोनस शेअर हे शेअर धारकांना दिले जातात. समजा , ABC कंपनीने १:१ बोनस जाहीर केला आणि एका शेअरचा भाव १०० रुपये आहे . आणि आपल्याकडे ABC कंपनीचे एकूण शेअर १०० असतील

तर बोनसनंतर:
१:१ बोनस म्हणजेच आपल्या एका शेअरवर एक शेअर बोनस मिळेल म्हणजेच आपल्याकडे एकूण शेअर २०० होतील आणि ABC कंपनीच्या एका शेअरचा भाव १०० रुपये वरून प्रति शेअर ५० रुपये होईल. शेअर बोनस जाहीर केल्याने शेअरची संख्या तर वाढतेच तसेच गुंतवणूकदारामध्ये उत्साह वाढतो आणि भविष्यात देखील शेअरच्या किंमती वाढण्यास देखील मदत होते.

6. स्टॉक स्प्लिट
स्टॉक स्प्लिट – Stock Split म्हणजेच शेअरचे होणारे विभाजन.शेअर विभाजित करण्यामागे मुख्य कारण म्हणजे बाजारात शेअरची संख्या वाढवणे ,जेणेकरून शेअरची Liquidity वाढेल.

समजा XYZ कंपनीचा एक शेअर आपल्याकडे आहे आणि हा शेअर 100 रु प्रति शेअर दराने उपलब्ध आहे, व कंपनीने 2:1 या प्रमाणात शेअर स्प्लिट केला तर 1 शेअरचे 2 शेअर होतील आणि शेअरची किंमत 100 रु वरून 50 रुपये प्रति शेअर होईल.जरी शेअरची संख्या 1 वरून 2 झाली तरी शेअरची किंमत कमी झाल्याने आपली एकूण गुंतवणूक सारखीच राहते. स्टॉक स्प्लिट केल्याने आपली शेअर संख्या वाढते त्यामुळे आपल्याला अधिकच्या शेअरवर डिव्हिडंड मिळू शकतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to earn money from the share market in Marathi.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x