Bajaj Finance Share Price | बजाज फायनान्सला 2420 कोटीचा नफा | प्रति शेअरवर रु.20 लाभांश देणार
बजाज फायनान्सने मार्च 2022 च्या तिमाहीत आतापर्यंतचा सर्वाधिक एकत्रित नफा नोंदवला आहे. बजाज फायनान्सने जानेवारी-मार्च 2022 तिमाहीत 2,420 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 80 टक्क्यांनी वाढला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला 1,346 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीचे निव्वळ व्याज उत्पन्न मार्च 2022 च्या तिमाहीत 30 टक्क्यांनी वाढून 6,068 कोटी रुपये झाले आहे जे मागील वर्षी याच कालावधीत 4,659 कोटी रुपये होते.
2 वर्षांपूर्वी