Gold Coin ATM | देशात गोल्ड कॉइन एटीएम लाँच | पैसे टाकल्यावर २४ कॅरेट सोन्याचे नाणे मिळणार
एखाद्याला सोन्याचं नाणं विकत घ्यायचं असेल आणि त्याला इथल्या ज्वेलर्स शॉपच्या गर्दीत अडकायचं नसेल तर पर्याय आला आहे. बँका एटीएम मशीनमधून पैसे देतात, त्याप्रमाणे आता सोन्याचे एटीएम सुरू करण्यात आले आहेत. येथे १ ग्रॅम आणि २ ग्रॅमची २४ कॅरेट सोन्याची नाणी या मशीनमध्ये खरेदी करता येतील. सध्या असे गोल्ड एटीएम क्वचितच लावले जात असले, तरी सुमारे २५ लाख रुपयांच्या सोन्याच्या नाण्यांचीही विक्री झाली आहे. जाणून घेऊयात हे गोल्ड एटीएम काय आहे आणि ते कसं काम करतं.
2 वर्षांपूर्वी