Infinix Zero Ultra Smartphone | 200 एमपी कॅमेरा असलेला इनफिनिक्स झिरो अल्ट्रा स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Infinix Zero Ultra Smartphone | इन्फिनिक्सने जागतिक बाजारात नवीन फ्लॅगशिप डिव्हाइस इन्फिनिक्स झिरो अल्ट्रा लाँच केले आहे. या स्मार्टफोनमध्ये १२० हर्ट्ज एमोलेड डिस्प्ले आणि २०० मेगापिक्सलचा कॅमेरा सेटअप दिला आहे. नवीन डिव्हाइसमध्ये अल्ट्रा मीडियाटेक डायमेन्शन ९२० प्रोसेसर आणि ८ जीबी रॅम देण्यात आली आहे. याशिवाय डिव्हाइसमध्ये ४५०० एमएएच बॅटरी, १८० वॉट फास्ट चार्जिंग, स्टिरिओ स्पीकर सेटअप आणि कर्व्ड डिस्प्ले यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
2 वर्षांपूर्वी