Lava Yuva Pro Smartphone | लावा युवा प्रो स्मार्टफोन लाँच, 5000mAh बॅटरीने सुसज्ज डिव्हाइस, किंमत जाणून घ्या
Lava Yuva Pro | लावाने शांतपणे भारतात लावा युवा प्रो फोन लाँच केला आहे. नवा फोन हा बजेट स्मार्टफोन असून कंपनीने आपल्या एन्ट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये तो सादर केला आहे. बहुतेक एंट्री-लेव्हल स्मार्टफोनप्रमाणेच लावा युवा प्रोमध्ये पॉलिकार्बोनेट बॉडी आहे. फोनच्या डिस्प्लेच्या वरच्या बाजूला वॉटरड्रॉप नॉच आहे. या स्मार्टफोनचा बॅटरी बॅकअपही खूप छान आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. हे डिव्हाइस ३.५ एमएम हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्टसह सुसज्ज आहे.
2 वर्षांपूर्वी