Ponniyin Selvan | पोन्नियिन सेल्वन चित्रपटात ऐश्वर्या राय सोबत झळकणार शोभिता धुलिपाला, फर्स्ट लुक आउट
Ponniyin Selvan | बहतांश बॉलिवूड कलाकार तमिळ चित्रपटांमध्ये काम करताना दिसून येतात. अश्यातच आता बॉलीवूडमधील अभिनेत्री शोभिता धुलिपाला मणिरत्नमच्या पीरियड ड्रामा पोन्नियिन सेल्वनमध्ये दिसून येणार आहे. दरम्यान, या मणिरत्नम चित्रपटामध्ये शोभिता वनथाच्या भुमिकेमध्ये दिसून येणार आहे. दरम्यान, आगामी चित्रपटाबाबत अभिनेत्रीने तिच्या पर्सनल अकाऊंटवरून चित्रपटामधील तिचा पहिला लूक शेअर केला आहे. मेड इन हेवन या वेब सिरीजमधून शोभिता धुलिपाला प्रसिद्ध झाली.
2 वर्षांपूर्वी