19 April 2024 12:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर Reliance Power share Price | अल्पावधीत 2400% परतावा देणारा रिलायन्स पॉवर शेअर होल्ड करावा की बाहेर पडावे? Samvardhana Motherson Share Price | 18 पैशाच्या शेअरची जादू! गुंतवणुकदार झाले करोडपती, पुढेही फायद्याचा स्टॉक Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला Infosys Share Price | भरवशाचे टॉप 7 शेअर्स स्वस्त झाले, पण व्हॉल्यूम लाखोमध्ये, संयम राखल्यास मिळेल मल्टिबॅगर परतावा IREDA Share Price | IREDA शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, सर्किट फिल्टरही वाढला, स्टॉक तुफान तेजीत येणार? Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, 1 वर्षात 412% परतावा देणारा 39 रुपयाचा शेअर तेजीत येणार?
x

Link Voter ID with Aadhaar | घरबसल्या तुमचं वोटर आयडी आधार कार्डशी जोडा, अशी आहे स्पेट बाय स्टेप प्रक्रिया

Link Voter ID

Link Voter ID with Aadhaar | निवडणूक आयोगाने मतदार आयटी कार्ड आधारशी लिंक करण्याची मोहीम सुरू केली आहे. निवडणूक आयोगाच्या मते मतदार यादीतील नावे योग्य असावीत, हा या मोहिमेचा उद्देश आहे. याशिवाय एखादी व्यक्ती एकापेक्षा जास्त भागातली मतदार आहे की एकाच भागातून एकापेक्षा जास्त वेळा रजिस्टर्ड आहे, याची माहिती मिळू शकणार आहे.

मोबाईलद्वारे वोटर आयडी आधारशी ऑनलाइन कसे जोडायचे ते येथे आहे:
१. सर्वात आधी गुगल प्ले स्टोअर (अँड्रॉइड युजर्स) किंवा अॅप स्टोअर (आयफोन युजर्स) वरून Voter Helpline App डाऊनलोड आणि इन्स्टॉल करा.
२. इन्स्टॉल केल्यानंतर हे अॅप ओपन करा आणि “I agree” आणि नंतर “Next” वर क्लिक करा.
३. अनेक पर्याय दिसतील, ज्याचा पहिला पर्याय म्हणजे “Voter Registration” वर क्लिक करणे.
४. “Electoral Authentication Form (Form6B)” आणि नंतर “Lets Start” निवडा.
५. आपला मोबाइल नंबर भरा आणि “Send OTP” वर क्लिक करा.
६. ओटीपी भरा आणि नंतर “Verify” वर क्लिक करा.
७. त्यानंतर “Yes I have voter ID” आणि नंतर “Next” या पहिल्या पर्यायावर क्लिक करा.
८. आता आपला मतदार ओळखपत्र क्रमांक भरा आणि राज्याची निवड करा.
९. त्यानंतर “Fetch Details” आणि “Proceed” वर क्लिक करा.
१०. स्क्रीनवर मागितले जाणारे तपशील भरा आणि “Next” वर क्लिक करा.
११. यानंतर आधार क्रमांक, मोबाईल नंबर, तुमचे लोकेशन याची माहिती द्या आणि त्यानंतर “Done” वर क्लिक करा.
१२. फॉर्म ६ बी चे पूर्वावलोकन पृष्ठ दिसेल.
१३. सर्व तपशील तपासा आणि फॉर्म सबमिट करण्यासाठी “Confirm” वर क्लिक करा.
१४. कन्फर्मेशननंतर फॉर्म 6 बीचा रेफरन्स नंबर मिळेल.
१५. फॉर्म-६बी हा आपला आधार क्रमांक निवडणूक आयोगाला शेअर करण्याचा एक फॉर्म असून तो nvsp.in उपलब्धही आहे.

मतदार ओळखपत्राशी आधार लिंक करणे आवश्यक नाही :
जर एखादा मतदार आपला आधार देत नसेल तर त्याचं नाव मतदार यादीतून हटवलं जाणार नाही, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. डिसेंबर 2021 मध्ये, संसदेने निवडणूक कायदा (दुरुस्ती) कायदा, 2021 ला मान्यता दिली होती, ज्याअंतर्गत आधार मतदार ओळखपत्राशी जोडला जात आहे. याअंतर्गत मतदार यादीतील मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राशी स्वेच्छेने आधार लिंक करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Link Voter ID with Aadhaar online process check details 18 August 2022.

हॅशटॅग्स

#Link Voter ID with Aadhaar(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x