परप्रांतीयांसमोर शिवसैनिक हैराण | कधी पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ | कधी डोकी फोडत आहेत
नालासोपारा, १२ ऑगस्ट : काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे उत्तर भारतीय कार्यकर्ते तुलसी सिंह राजपूत यांनी नितीन नांदगावकर यांना फोन करून अत्यंत घाणेरड्या आणि गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती. शिवसैनिक तुलसी सिंह राजपूत हे मूळचे उत्तर भारतीय कार्यकर्ते असून मी राजपूत असल्याचा कांगावा करत अप्रत्यक्षरित्या मराठीलाच आवाहन दिल्याचं संभाषणातून समोर आलं होतं.
नितीन नांदगावकर यांना धमकी देताना तुलसी सिंह राजपूत यांनी संभाषणात थेट शिवसेना भवनाचा उल्लेख करत, “जा तिकडे आणि विचार मी कोण आहे” असं सांगत नितीन नांदगावकर यांना थेट धमकावलं होतं. या भांडणांमागे हिरानंदानी रूग्णालयातील सुरक्षारक्षकांशी झालेल्या बाचाबाचीचा त्यांनी नांदगावकर यांना जाब विचारला आणि शब्दाला शब्द वाढत गेल्याचं ऑडिओक्लिपमध्ये ऐकू येतं होतं. तुलसी सिंह राजपूत यांच्या एकूण संभाषणात त्यांना शिवसैनिक असण्यापेक्षा उत्तर भारतीय असण्याची अधिक गरमी असल्याचं निदर्शनास आलं होतं. मात्र एका उत्तर भारतीय शिवसैनिकाने दुसऱ्या मराठी शिवसैनिकाची ज्या गलिच्छ भाषेत हेटाळणी केली होती तरी मराठीच्या न्याय हक्कावरून बोंबा मारणारे शिवसैनिक त्यावेळी शांत बसून राहिल्याचं पाहायला मिळालं होतं.
त्यानंतर आता शिवसेना पदाधिकाऱ्यासंबंधित दुसरी घटना घडली आहे. शिवसेनेच्या विभागप्रमुखावर परप्रांतीयाने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार नालासोपाऱ्यात घडला आहे. सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केल्याचा व्हिडीओ काढल्याच्या रागातून एका परप्रांतीयाने शिवसेनेच्या विभागप्रमुखावर जीवघेणा हल्ला केला आहे.
आज दुपारी साडे बाराच्या दरम्यान ही घटना घडली आहे. नालासोपारा पूर्वेकडील संयुक्त नगर येथील विभागप्रमुख जितेंद्र हजारे हे आपल्या कार्यालयातून घराकडे जात असताना, ऑफिसच्या बाजूचा लोखंडी स्टील विकणारा यादव नावाचा व्यक्ती सार्वजनिक स्थळी लघुशंका करत असल्याचं हजारे यांच्या निदर्शनास आलं. त्यावेळी त्यांनी आपल्या मोबाईलमधून त्याचा व्हिडीओ काढला.
व्हिडीओ काढत असल्याचं लक्षात येताच, यादव आणि आणखीन दोघांनी, लोखंडी रॉड ने हजारेंवर जीवघेणा प्रहार केला. यात हजारे यांना डोक्याला आणि हाताला गंभीर जखम झाली आहे. हाताचे बोटही फ्रॅक्चर झाली आहे. सध्या तुलिंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचं काम सुरु आहे. मात्र संपूर्ण शिवसेनेत अगदी पक्षाने आदेश काढल्याप्रमाणे परप्रांतीयांच्या विषयावर जराही भाष्य किंवा प्रतिक्रिया दिली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतं आहे.
News English Summary: As Jitendra Hazare, the department head at Samyukta Nagar, east of Nalasopara, was walking home from his office, he noticed a man named Yadav, who was selling iron steel next to his office, urinating in a public place. At that time, he took a video of it from his mobile.
News English Title: Attack on Shivsena vibhagpramukh Jitendra Hazare by migrant in Nalasopara News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट