23 April 2024 3:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्समध्ये तेजी कायम राहणार? अपडेटनंतर तज्ज्ञांचे मत काय? GTL Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजची कृपा झाली, स्वस्त GTL शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

कल्याण ग्रामीण: मनसेचे प्रमोद पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला

MNS, Raju Patil, Avinash Jadhav, Raj Thackeray, Kalyan Gramin, Maharashtra Vidhansabha Election 2019

कल्याण: मनसेचे नेते प्रमोद रतन पाटील यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघातून जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज आज दाखल केला. कल्याण ग्रामीण मतदारसंघ २००९मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ताब्यात घेतला होता. त्यावेळी मनसेचे रमेश पाटील यांनी शिवसेनेला धोबीपछाड देत विधानसभा गाठली होती. मात्र २०१४मध्ये आलेल्या मोदी लाटेमुळे इथली समीकरणं बदलली आणि विधानसभा निवडणुकीत युती संपुष्टात आली तरी शिवसेना एनडीएचा घटक पक्ष असल्याने त्याचा थेट फायदा शिवसेनेच्या उमेदवारांना झाला होता आणि शिवसेनेचे सुभाष भोईर यांनी ८४, ११० मतं घेत विधानसभा गाठली होती, तर मनसेचे रमेश पाटील यांना ३९, ८९८ मतं मिळाली होती.

मात्र मागील ५ वर्षात परिस्थिती मोठ्या प्रमाणावर बदलली आहे. त्यात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराने सामान्य नागरिक देखील संतापल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, या मतदारसंघात दिवा आणि २७ गाव आदी ग्रामीण परिसराबरोबच डोंबिवली शहराचा काही भाग देखील समाविष्ट आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी अशा मिश्र स्वरूपाचा हा मतदारसंघ आहे. मात्र आजही मतदार संघात शिवसेनेची ताकद असली तरी विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना सेनेच्या एका गटाचा प्रचंड विरोध असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे या निवडणुकीत सेनेच्या सुभाष भोईर यांच्या विरुद्ध सेनेतील एक गट बंडखोरी करण्याच्या तयारीत असून त्यात विद्यमान आमदार सुभाष बोईर यांचा पाडाव केला जाऊ शकतो.

सध्याच्या राजकीय स्थितीत कल्याण-डोंबिवलीतील एकूण ४ विधानसभा मतदार संघापैकी केवळ कल्याण ग्रामीण हा एकमेव मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. जर हा गड देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काबीज केल्यास याचा मोठा फटका पुढील वर्षी होऊ घातलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत बसू शकतो. दरम्यान, शिवसेनेने विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना पक्षाने एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे भोईर यांची उमेदवारी फायनल झाली आहे. तत्पूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी ग्रामीणमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी मोतोश्रीवर मोठी फिल्डींग लावली होती. तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीपासून ते मोठ्याप्रमाणावर कामाला देखील लागल्याचे पाहायला मिळाले होते. वास्तविक २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत देखील रमेश म्हात्रे इच्छूक होते. सेनेने दखल न घेतल्याने आणि भाजपकडे उमेदवार नसल्याने त्यांना भाजपने ऑफर केली होती. परंतु, त्यावेळी मातोश्रीने त्यांना थंड केलं आणि विषय बासनात गुंडाळला. मात्र यावेळी पुन्हा त्यांच्याशी दगा फटका झाल्याने ते प्रचंड संतापल्याचे वृत्त आहे.

त्यामुळे सुभाष भोईर यांना उमेदवारी मिळाल्याने यंदा ते माघार घेतात की बंडखोरी करत स्वतःच अस्तित्व टिकवतात ते पाहावं लागणार आहे, अन्यथा पुढील वर्षी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुभाष भोईर त्यांचा काटा काढून, त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी कार्यरत होतील असं सेनेचेच पदाधिकारी दबक्या आवाजात बोलत आहेत.

दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीत युतीला १ लाख २६ हजार मते मिळाली तर आघाडीच्या पारड्यात ४३ हजार ८६९ मते मिळाली आहेत. २००९ च्या निवडणुकीत मनसेचे रमेश पाटील हे निवडून आले होते. तर यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना येथून राजू पाटील यांना तिकीट देणार हे जवळपास निश्चित झालं आहे. काँग्रेसने आयत्यावेळी संतोष केणे यांना निवडणूक लढविण्यास सांगितल्याने ते निवडणूक लढविण्यास तयार नसल्याचे समजते. त्यात स्थानिक आगरी कोळी भूमीपूत्र काँग्रेसचे संतोष केणे यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे सुस्तावलेल्या काँग्रेस उमेदवाराचा फायदा मनसेला होण्याची शक्यता आहे. एक गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे आणि ती म्हणजे मागील विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजपने स्वतंत्रपणे लढवली होती तरी भाजपने येथून उमेदवार न दिल्याने सेनेचा मार्ग सोपा झाला होता.

त्यात ग्रामीण परिसर असलेल्या या मतदार संघात २७ गावाचा परिसर येतो. २७ गावांची स्वतंत्र नगरपालिकेचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, मात्र ४ वर्षे उलटल्यानंतरही हे आश्वासन पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे गावकर्‍यांच्या नाराजीचा किती फटका युतीला बसतो हेच पाहावे लागणार आहे. तसेच कल्याण डोंबिवलीसाठी जाहीर केलेलं ६५०० कोटींचं पॅकेज हवेतच राहिल्याने स्थानिक मतदारांमध्ये भाजप विरोधात खदखद असल्याचे पाहायला मिळते आणि भाजपने उमेदवार दिला तरी तो पडणार अशीच राजकीय स्थिती आहे.

२०१४ ची विधानसभेतील मते;

सुभाष भोईर (शिवसेना) : ८४, ११०
रमेश पाटील (मनसे) : ३९ ८९८
वंडार पाटील (राष्ट्रवादी) : १९,७८३
शारदा पाटील (काँग्रेस ) : ९२१३

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x