14 November 2019 12:01 AM
अँप डाउनलोड

पालघर: शिवसेनेचे विद्यमान आमदार अमित घोडा यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Shivsena, NCP, MLA Amit Ghoda, Palghar

पालघर: निवडणुकांचे अर्ज भरण्यास सुरुवात झालेली असताना देखील अजून पक्षप्रवेश सूरच आहेत. सत्ताधारी पक्षातील म्हणजे शिवसेना आणि भाजपमधील तिकीट न मिळालेली मंडळी दुसऱ्या पक्षात उडया घेताना दिसत आहेत. पालघर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अमित घोडा यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आता एनसीपी’मध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेने पालघर विधानसभेसाठी श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली आहे.

त्यामुळे संतापलेले विद्यमान आमदार अमित घोडा यांनी पुन्हा एकदा एनसीपी’मध्ये प्रवेश केला आहे. अमित घोडा हे माजी आमदार कृष्णा घोडा यांचे चिंरजीव आहेत. २०१४ साली कृष्णा घोडा यांनी राष्ट्रवादीला सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. अवघ्या पाचशे मतांनी त्यांचा विजय झाला होता. त्यानंतर एकाच वर्षात त्यांचे निधन झाल्यामुळे पोटनिवडणुकीत अमित घोडा आमदार म्हणून निवडून आले होते.

हॅशटॅग्स

#NCP(218)#Shivsena(726)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या