14 December 2024 2:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ; शिवसैनिकांचं भाजप विरोधात बंड

BJP MLA Sanjay Kelkar, Maharashtra Vidhansabha Election 2019, Shivsena, BJP Thane, MNS Avinash Jadhav, Thane City Vidhansabha Constituency

ठाणे: विधानसभा निवडणुकीचा प्रचार दोन दिवसांवर आलेला असतात ठाणे शहर मतदारसंघात शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला गेल्याचं वृत्त आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान,एकूणच ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातं असल्याने शिवसेना हा मतदारसंघ सोडण्यास तयार नाही.

त्यामुळे ठाणे शहर विधानसभेची जागा ही शिवसेनेलाच मिळावी यासाठी शहरातील शिवसेना पदाधिकारी एकवटले आहेत. त्यानंतर देखील ही जागा भाजपला सोडल्यास निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला कोणतंही सहकार्य न करण्याचा इशारा स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे आणि त्यानिमित्त टेंभी नाक्यावरील कार्यालयात तातडीची बैठक घेण्यात आली आहे आणि या बैठकीतच हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व पक्षीय मोठ बांधण्याचा निर्धारही देखील यावेळी करण्यात आला आहे.

आमच्या मागण्यांकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्यास सार्वजनिक राजीनामे देण्याची तयारी सुध्दा या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे ठाण्याचे आव्हान भारतीय जनता पक्षाला अत्यंत कठीण जाणार असल्याचे या क्षणाला दिसत आहे. ठाणे शहर मतदारसंघात विद्यमान आमदार संजय केळकर हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. २०१४ च्या निवडणुकीत संजय केळकर यांनी याच मतदारसंघात तब्बल १२,५८८ हजारांचे मताधिक्य घेतलं होतं. मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेत युतीचे उमेदवार राजन विचारे यांना या मतदारसंघातून तब्बल १ लाख ३० हजार इतकं मतदान झालं होतं. त्यामुळे विधानसभेत शिवसैनिकांनी या मतदारसंघावर दावा ठोकला आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x