15 December 2024 5:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

नवी मुंबईत शिवसेनेला खिंडार; भाजपने सेनेचे नगरसेवक फोडले

Shivsena, Navi Mumbai Shivsena Corporators, BJP, latest news updates

नवी मुंबई,१३ मार्च: नवी मुंबईत शिवसेनेला खिंडार पडलं आहे. 3 नगरसेवक भाजपच्या गळाला लागले आहेत. घनसोलीतील तीन नगरसेवकांनी आयुक्तांकडे राजीनामा सोपवला आहे. नगरसेवक प्रशांत पाटील, नगरसेविका कमलताई पाटील आणि नगरसेविका सुवर्णा पाटील यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेनेतचे तिन्ही नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

घणसोलीतील प्रशांत पाटील यांच्यासह त्यांच्या परिवारातील तीन नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत. घणसोली सेंट्रल पार्क व इतर विकासकामाच्या उद्घाटनासाठी प्रशांत पाटील यांनी लावलेल्या बॅनरवर भाजपचे आमदार गणेश नाईक आणि इतर भाजप नेत्यांचे फोटो झळकले होते.या सोहळ्याला थेट गणेश नाईक यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नवी मुंबईत गणेश नाईक यांना पक्षात आणून संपूर्ण शहरात शिवसेनेला एकही जागा दिली नव्हती. त्यामुळे सध्या नवी मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये शिवसेना सत्तेच्या जोरावर पक्ष विस्तार करण्याची योजना आखात आहे आणि त्यात नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने त्याला प्राधान्य दिल आहे.

त्यासाठी गणेश नाईक यांचे भाजपात गेलेले समर्थक पक्षात आणण्याची योजना आखली आहे. शिवसेनेतील मोठ्या नेत्यांवर जवाबदारी देऊन गणेश नाईक समर्थक नगरसेवकांशी संपर्क सुरु झाला होता. मात्र भाजपमधील नगरसेवकांशी संपर्क साधण्याच्या नादात स्वतःच्या पक्षातील नगरसेवक कधी संपर्काच्या बाहेर गेले ते शिवसेनेच्या नेत्यांना समजलंच नाही असं म्हणावं लागेल.

 

News English Summery: Shiv Sena has lost its fort in Navi Mumbai. 3 corporators are on the throats of BJP. Three councilors in Ghansoli have submitted their resignations to the Commissioner. Councilor Prashant Patil, corporator Kamaltai Patil and corporator Suvarna Patil have resigned. It is learned that the three Shiv Sena leaders will be joining the BJP soon. Prashant Patil from Ghansoli along with three members of his family are on the way to BJP. On the banner put up by Prashant Patil for the inauguration of Ghansoli Central Park and other development works, photos of BJP MLA Ganesh Naik and other BJP leaders were featured. Ganesh Naik was invited to the event.

 

News English Title: Story Shivsena navi Mumbai 3 corporators resign to join BJP latest news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x