13 December 2024 11:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

राज ठाकरेंच्या महाराष्ट्र सैनिकाने वृद्ध महिलेला धक्काबुक्की करत कानशिलात लगावली | हिंदूंना मारणारं हे कसलं मनसेचं हिंदुत्व?

Raj Thackeray

Raj Thakeray | मुंबईत हिंदुत्वाचा प्रचंड करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याची हिंदू महिलेला दादागिरी करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. गणेश चतुर्थीदरम्यान दिवशीच या उन्मत्त पदाधिकाऱ्याने एका महिलेला बेदम मारहाण केली आहे. त्यात ती गटारात देखील पडली असती तर मोठा अपघात घडला असता हे देखील व्हिडिओत दिसतंय. ही धक्कादायक घटना मुंबाईदेवी परिसरात घडल्याची माहिती मिळाली आहे.मुंबादेवी परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरुन एका महिलेला मारहाण करण्यात आली.

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. मनसे पदाधिकाऱ्याने महिलेला मारहाण केल्याचं दिसत आहे. मारहाण करणारा व्यक्ती मनसेचा उपविभाग प्रमुख असून त्याचं नाव विनोद अरगिले असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

महिलेच्या मेडिकलसमोर गणेशोत्सवाच्या बॅनरसाठी खांब :
प्रकाश देवी यांचे मुंबादेवी परिसरात मेडिकल आहे. त्यासमोर गणेशोत्सवाच्या बॅनरसाठी खांब रोवण्यात येत होता. मनसे पदाधिकारी विनोद अरगिळे आणि त्यांचे साथीदार बल्ली रोवत होते. त्यातील एक बल्ली प्रकाश देवी यांच्या मेडिकलसमोरही रोवण्यात येत होती. त्याला त्यांनी कडाडून विरोध केला. तसेच ही बल्ली, लाकडी खांब काढून घेण्याची मागणी केली. त्यावरुन वाद वाढला. यानंतर मनसे कार्यकर्त्याने वृद्ध महिलेच्या कानशिलात लगावली. तिला धक्काबुक्की केली. यामध्ये ती महिला दोनदा खाली पडली. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतं असून मनसेवर प्रचंड टीका सुरु झाली आहे.

महिलेनं विनोद यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दादागिरी करून शिवीगाळ केली. याशिवाय हात उगारला आणि बेदम मारहाण केल्याचंही या महिलेनं पोलिसांना सांगितलं आहे. या प्रकरणी राज ठाकरे आता या पदाधिकाऱ्यावर काय कारवाई करणार हे देखील पाहावं लागणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: A senior woman beaten up by MNS party workers in Mumba Devi trending video on social media 01 September 2022.

हॅशटॅग्स

#Raj Thackeray(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x