29 March 2024 5:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

Trending Video | जमाव रावण दहन करायला गेला आणि रावणाने केला असा प्रति हल्ला, सगळी पळापळ सुरु झाली, पहा व्हायरल व्हिडीओ

Ravan Dahan Video Viral

Trending Video | भारतभरामध्ये सन मोठ्या थाटामाठात आणि उत्साहात पार पडतात. दरम्यान, नुकताच दसऱ्याचा सण पार पडला. दसऱ्याच्या दिवशी प्रत्येक गावामध्ये जत्रा आणि रावण दहन हे सर्वात मोठे आकर्षण असते. दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तसेच दसरा मेळ्यांमध्ये किरकोळ अपघात, सर्रास घडत असल्याचे दिसून येते मात्र यावेळीही दसऱ्यानंतर अशी काही प्रकरणे समोर आली आहेत. जळणारा रावण लोकांच्या गर्दीवर पडला.

लोकांच्या गर्दीवर पडला जळणारा रावण
रावणाने लोकांवर हल्ला केला आपण असं का बोलत आहोत असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. तर त्याचे उत्तर तुम्हाला व्हिडिओ पाहून मिळेल. असाच एक प्रकार सोशल मीडियावरून समोर आला आहे, जिथे रावणाचे दहन केल्यानंतर जळत्या रावणातून फटाके जमावांच्या दिशेने येऊ लागले. रावणाच्या दहनातून निघणाऱ्या फटाक्यांची ही घटना उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील एका सरकारी इंटर कॉलेजच्या मैदानावरील आहे, येथे रावण दहनानंतर असे फटाके सोडण्यात आले की लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली व रावण दहन दरम्यान घडलेली ही विचित्र घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.

व्हायरल झाला व्हिडीओ
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रावणातून निघणारी आग लोकांच्या दिशेने जात आहे आणि त्यानंतर तिथे उभे असलेले लोक जिव वाचवण्यासाठी पळत आहेत. सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात असलेले पोलिसही लपूनछपून धावताना दिसत आहेत. मात्र, काही वेळाने सर्व काही शांत झाले आणि लोक परत येऊ लागले तसेच उभे राहून पुन्हा रावण दहन पाहू लागले. चांगली बाब म्हणजे या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. हा व्हायरल व्हिडिओ पत्रकार उमाशंकर सिंह नावाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे तसेच त्याने कॅप्शनमध्ये मजेशीरपणे लिहिले की, ‘मुझफ्फरनगरमध्ये दहन केल्याने संतापलेल्या रावणाने घटनास्थळी उपस्थित लोकांवर बाण सोडले’ हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 52 हजार लोकांनी पाहिला आहे आणि 9 हून अधिक लोकांनी पाहिला आहे तर हजारो वापरकर्त्यांनी व्हिडिओला लाईक केले आहे. सोशल मीडियावर यूजर्स याला रावणाचा बदला म्हणत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Ravan Dahan viral video trending on social media checks details 07 October 2022.

हॅशटॅग्स

Ravan Dahan Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x