14 December 2024 4:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Video Viral | श्री हनुमान चालीसा पठण करणाऱ्या नवनीत राणा श्रीकृष्ण जन्माच्या दिवशीही धादांत खोटं बोलल्या, व्हिडिओ व्हायरल

Video Viral

Video Viral | आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे खऱ्या अर्थाने गरीबांचे कैवारी आहेत, हनुमान चालीसा म्हटल्याबद्दल त्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं, आता आमचं सरकार आहे, आमचं सरकार हे हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचा सत्कार करणारं आहे असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते अमरावतीमध्ये राणा दाम्पत्यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात बोलत होते.

अमरावतीच्या राणा दाम्पत्यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला होणार होती. यासाठी तीन हजार लोकांनी रक्तदान केली असल्याची माहिती होती. या रक्ततुलास देवेंद्र फडणवीसांनी नकार दिला. या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचताच देवेंद्र फडणवीसांनी हाताच्या इशाऱ्याने वजनकाटा हटवण्यास सांगितला. त्यानंतर तो वजनकाटा हटवण्यात आला आणि त्यांची रक्ततुला रद्द करण्यात आली.

दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी उपस्थितांना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी धादांत खोटं वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे. आम्ही हनुमान चाळीसा वाचणारे असं सांगणाऱ्या नवनीत राणा खोटं बोलण्यात तरबेज असल्याचं अजून एकदा समोर आलं आहे आणि त्यासंदर्भात त्यांचा एक व्हिडिओ सुद्धा प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये त्या आपण २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे खासदार झाल्याचं सांगत आहेत. तसेच मी २०१४ मध्येच खासदार झाले असते जर फडणवीस माझ्या सोबत असते, मात्र २०१४ मध्ये फडणवीस मुख्यमंत्री होतील असं त्यांना स्वतःला स्वप्नात वाटलं नसेल तर ते नवनीत राणा यांना कुठून खासदार करणार होते. वास्तविक नवनीत राणा या २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर खासदार झाल्या होता आणि त्यांनी ११ एप्रिल २०२२ मध्ये एका जाहीर कार्यक्रमात त्याची कबुली देत शरद पवार यांचं नावं घेतलं होतं. तर २१ ऑगस्ट २०२२ मध्ये म्हणजे कृष्ण जन्माच्या शुभं मुहूर्तावर म्हणजे २१ ऑगस्ट २०२२ रोजी भलतंच खोटं बोलत आहेत. त्यामुळे भगवान हनुमान आणि श्रीकृष्ण हे सर्व पाहतोय असं नेटिझन्स सांगत असून त्यांना भविष्यात याची किंमत मोजावी लागेल असं संतापाने व्यक्त होतं आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Video Viral Dahi Handhi Utsava Amaravati 2022 MP Navneet Rana talking lie on political status video trending on social media 18 August 2022.

हॅशटॅग्स

#Video Viral(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x