20 April 2024 10:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

Crime Patrol | गुजरातमधील मुंद्रा बंदरातून तब्बल 9 हजार कोटींचे हेरॉइन जप्त

Heroin seized from Gujarat Mundra port

गांधीनगर, २० सप्टेंबर | गुजरातच्या कच्छच्या मुंद्रा बंदरावर हेरॉईन पकडण्यात आले आहे, ज्याची किंमत सुमारे 9 हजार कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. ही हेरॉईन अफगाणिस्तानातून आयात केले जात होते. दरम्यान, त्याला गुप्तचर यंत्रणेने बंदरावर पकडले आहे. हे हेरॉईन टेलकम पावडरच्या स्वरूपात भारतात आणले जात होते. परंतु, एजन्सीने वेळीच लक्ष दिल्याने बंदरावर ही आयात रोखण्यात आली. दरम्यान, एजन्सीची ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. यातील कंटेनर आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आशी ट्रेडिंग फर्मच्या माध्यमातून आफगाणिस्तानातून मुंद्रा बंदरावर आयात करण्यात आले होते.

Crime Patrol, गुजरातमधील मुंद्रा बंदरातून तब्बल 9 हजार कोटींचे हेरॉइन जप्त – Heroin worth rupees 9 thousand crore seized from Gujarat Mundra port :

हसन हुसेन लिमिटेड:
फर्मकडे यातील मालाबद्दल चौकशी केली असता, ही टेलकम पावड असल्याचे सांगितले होते. दरम्यान, गुप्तचर विभागाला शंका आल्याने त्यांची तपासणी केली. त्यावेळी त्यामध्ये हेरॉईन असल्याचे समोर आले. ही निर्यात करणारी फर्म अफगाणिस्तानच्या कंधार येथे ‘स्थित हसन हुसेन लिमिटेड’ म्हणून ओळखली जाते. (Heroin seized from Gujarat Mundra port)

डीआरआय आणि कस्टमचे ऑपरेशन गेल्या पाच दिवसांपासून सुरू होते. ही कारवाई झाल्यानंतर अधिकार्‍यांनी पुढील तपासणीसाठी माल पाठवल्याची माहिती आहे. तसेच, मुंद्रा बंदराव्यतिरिक्त गांधीधाम, मांडवी, दिल्ली, अहमदाबाद आणि चेन्नईसह 5 इतर शहरांचा तपास करण्यात आला. या तपासात टेलकम पावडरच्या स्वरुपात करोडो किमतीची औषधे आयात केली जात असल्याची माहिती शोध यंत्रणेच्या लक्षात आली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Heroin worth rupees 9 thousand crore seized from Gujarat Mundra port.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x