18 April 2024 7:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 18 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 4 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 33 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Tinna Rubber Share Price | श्रीमंत करतोय हा शेअर! 3 वर्षात 1 लाख रुपयाच्या गुंवतवणुकीवर दिला 4.42 कोटी परतावा Lorenzini Apparels Share Price | 27 रुपयाच्या शेअरची कमाल, मल्टिबॅगर परताव्यसह स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सचा लाभ Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स गुंतवणूकदारांसाठी फायद्याची बातमी, सकारात्मक तेजीचे संकेत Stocks To Buy | अल्पवधीत मालामाल होण्याची संधी, हा शेअर देईल 35 टक्के परतावा, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
x

मोदी है तो मुमकिन है | तिरंगा यात्रेत फुकट पेट्रोलसाठी भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Uttar Pradesh Assembly Election 2022

कोशांबी, १६ ऑगस्ट | यूपीतल्या कोशांबीचे आमदार संजय कुमार गुप्ता यांनी तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकार्त्यांसाठी आमदार गुप्तांनी मोफत ठेवलं होतं. त्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. आधी धक्काबुक्कीपर्यंत असलेलं प्रकरण नंतर थेट हाणामारीपर्यंत गेलं. कोखराज पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.

तिरंगा यात्रेत गर्दी जमवण्यासाठी आमदार संजय कुमार गुप्तांनी मोफत पेट्रोल देण्याची घोषणा केली. त्यामुळे शेकडो लोक तिरंगा यात्रेत सहभागी होण्यासाठी पोहोचले. स्वत:चा जीव धोक्यात घालून लोक पेट्रोलच्या बाटल्या मिळवण्यासाठी धडपडत होते. यावेळी काही अनर्थ घडला असता, तर शेकडो लोकांच्या जीवावर बेतलं असतं. परंतु, त्याची कोणतीही पर्वा न करता लोकांची मोफत पेट्रोलसाठी झुंबड उडाली.

कौशांबीतल्या चायल विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुमार गुप्ता यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं. यात्रेत मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन गुप्ता यांनी केलं होतं. भरवारीतल्या किड्सझी स्कूल कॅम्पसमधून यात्रा सुरू होणार होती. यात्रेत सहभागी होणाऱ्यांना मोफत पेट्रोल देण्याची घोषणा आमदारांनी केली होती. पेट्रोलच्या हजारो बाटल्या स्कूल कॅम्पसमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. तिरंगा यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी बाटल्या मिळवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. परिसरात चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. पेट्रोलच्या बाटल्यांसाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते भिडले. त्यांनी एकमेकांना मारहाणदेखील केली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Uttar Pradesh Kaushambi BJP MLA Sanjay Gupta Tiranga yatra free petrol bottle- offer loot news updates.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x