23 April 2024 1:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत खरेदी करा 30 शेअर्स, हे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करू शकतात Vikas Lifecare Share Price | 5 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत, अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतोय, नेमकं कारण काय? Tata Technologies Share Price | तेजीत कमाई होणार, टाटा टेक्नॉलॉजी शेअरसह हे 4 शेअर्स अल्पावधीत खिसा भरणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, सकारात्मक अपडेटने स्टॉक सुसाट धावणार SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची विशेष योजना, दरमहा बचतीवर खात्रीने मिळेल 80,000 रुपयांचा परतावा
x

मुंबईकरांनो काळजी घ्या | हवामान विभागाकडून शहरात अतिवृष्टीचा इशारा

Rain Update

मुंबई, ०८ जून | मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील ४ दिवसांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचा प्रत्यय मुंबईत पहायला मिळाला. सोमवारी रात्रीपासून मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्र पहायला मिळालं.

सकाळच्या वेळेतही मुंबईतील अनेक भागांमध्ये पाऊस सुरु होता. दादर, वरळी, वांद्रे, अंधेरी, चेंबूर, कुर्ला, सायन या भागात सकाळपासून पावसाची संततधार सुरु होती. ज्यामुळे सायन भागात पाणी साचलेलं पहायला मिळालं. षण्मुखानंद हॉल परिसरात पाणी साचल्यामुळे या भागातील वाहतूकही धीम्या गतीने जात होती. दरम्यान शहरातील रस्त्यांवर पाणी साचू नये यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी केली असून जागोजागी पंप लावून पाण्याचा निचरा होण्याचे प्रयत्न केले जात होते.

दरम्यान या चार दिवसांच्या काळात हवामान विभागाने आपत्ती व पुनर्वसन विभागाला सर्व संबंधित जिल्हा यंत्रणांशी संपर्क साधून सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही धोकादायक इमारती, दरड क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईच्या हिंदमाता परिसरात नेहमी पावसात पाणी साचल्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण होते. मात्र यंदा पाणी साचणार नाही याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

याव्यतिरीक्त सध्या मुंबईत अनेक विकासकामं सुरु आहेत. या पावसाचा विकासकामांवर परिणाम होणार नाही तसेच झाडं कोसळून, मॅनहोल उघडी राहून होऊ शकणाऱ्या अपघातांचा मुद्दा लक्षात घेऊन योग्य त्या उपाययोजना आधीच करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. याव्यतिरीक्त इतर जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांना सज्ज राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

 

News English Summary: The meteorological department has warned of heavy rains in the next four days in all districts of Konkan including Mumbai. His suffix was seen in Mumbai. Heavy rains lashed many parts of Mumbai since Monday night. This gave a picture of stagnant water in many low lying areas.

News English Title: The meteorological department has warned of heavy rains in the next four days in all districts of Konkan including Mumbai news updates.

हॅशटॅग्स

#WeatherForecast(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x