29 March 2024 10:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल
x

पर्सनल चॅट गुप्ततेचा मुद्दा समोर येताच व्हाट्सअँपचं इतर बॅकअप प्लॅटफॉर्मकडे बोट?

Whatsapp, end to end encryption, NCB, Retrieved chat security, Bollywood

मुंबई, 26 सप्टेंबर : सुशांत प्रकरणावरुन सुरु झालेल्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांची नावं समोर येत आहेत. या प्रकरणात बॉलिवूड कलाकरांचं व्हॉट्सऍप चॅट सतत चर्चेत आहे. सुशांतच्या निधनानंतर सुरु झालेल्या चौकशीदरम्यान, ड्रग्जबाबत अनेक गोष्टींचा खुलासा होत आहे. एनसीबीने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह अनेकांना ताब्यात घेतलं आहे. त्याशिवाय एका-मागे एक बॉलिवूड सेलिब्रिटींचं जुनं व्हॉट्सऍप चॅटही उघड होत आहे.

आता या प्रकरणी दीपिकाचं ड्रग्ज चॅट समोर आल्यानंतर एनसीबीने तिला समन्स पाठवला. दीपिकाचं हे समोर आलेलं चॅट 2017 मधलं आहे. दीपिकाने ड्रग्ज चॅट डिलीट केल्यानंतरही, वर्षांपूर्वीचं चॅट आता एनसीबीकडे कसं आलं?

व्हॉट्सऍपने दावा केला आहे की, त्यांचे सर्व चॅट एन्ड टू एन्ड इंक्रिप्शन (Whatsapp End to end Encrypted) असतात. याचा अर्थ हे चॅट केवळ पाठवणारा आणि ज्याला पाठवलं तो वाचू शकतो. व्हॉट्सऍपही हे चॅट वाचू शकत नाही कारण चॅट कोणत्याही सर्व्हरवर सेव्ह होत नाही. परंतु सुशांतच्या मृत्यूप्रकरणी चौकशीदरम्यान लीक झालेल्या अनेक चॅटमुळे कंपनीच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

एन्ड टू एन्ड इंक्रिप्शन व्हॉट्सऍपच्या (Whatsapp End to end Encrypted) सर्व चॅटला प्रोटेक्ट करते. सेंडर आणि रिसिव्हरशिवाय चॅट्स कोणी वाचू शकत नाही. व्हॉट्सऍपवर फोन नंबरद्वारे लॉगइन केलं जातं. त्यामुळे कंपनीही मेसेज कंटेंट एक्सिस करु शकत नाही. कंपनी Operating System Manufacturers च्या संपूर्ण गाईडलाईन्स पाळतात. त्यामुळे केवळ फोन डिव्हाईसवर चॅट सेव्ह होऊ शकतात.

सुशांत राजपूतची टॅलेंट मॅनेजर जया साहाद्वारे दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्माचं चॅट एनसीबीच्या हाती लागलं असल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयाने तिच्या व्हॉट्सऍप चॅटचा बॅकअप Google Drive किंवा iCloud वर घेतला होता.

कोणताही बॅकअप प्लॅटफॉर्म, व्हॉट्सऍपच्या एन्ड टू एन्ड इंक्रिप्शन पॉलिसीमध्ये कव्हर होत नाही. अशात जर कोणत्याही तपास यंत्रणेने एखाद्या संशयिताच्या फोनचा डेटा दुसऱ्या कोणत्याही डिव्हाईसवर कॉपी केल्यास, फोन क्लोनिंगचा वापर होतो. ज्याद्वारे Backed up Chats सहजपणे वाचले जाऊ शकतात. Law enforcement agencies आणि बॉलिवूड कलाकारांच्या लीक चॅटसोबत अशाच प्रकारची बाब झाल्याचं समजतं आहे.

 

News English Summary: The probe into the Bollywood drug scandal has thrown up the names of several A-listers and many are in line to be questioned. Most of the information that the Narcotics Control Bureau (NCB) has managed to get is from the deleted WhatsApp chats. The mobile phone of Rhea Chakraborty and others were cloned for give the agencies the option to clone it in order to give access to the chats of the film stars. The question is while WhatsApp claims that there is end-to-end encryption, how has the NCP managed to crack the chats. WhatsApp says in its security settings that there is end-to-end encryption for all the messages. However, the media and message back up on Google Drive or any such Cloud Services are not protected from end-to-end encryption. This encryption would mean that messages are visible only to the sender and the recipient. However, investigators can take a users’ phone and create a clone of it on another device.

News English Title: Whatsapp end to end encryption NCB retrieved chat security Bollywood Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Whatsapp(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x