मुंबई : महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण खात्याचे कॅबिनेट मंत्री रामेश्वर (म्हणजे महाजनांचे पीए) आहेत, तर त्याच खात्याचे राज्यमंत्री म्हणून जाधव मॅडम (म्हणजे महाजनांच्या ओएसडी) काम पाहतात. तर जलसंपदा खाते स्वत: मुख्यमंत्री सांभाळतात असं घणाघाती टीका आणि शेलक्या भाषेत केंद्रीय रस्ते विकास व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची भाजपच्या नेते मंडळींसमोर फिरकी घेतली.
नितीन गडकरी यांनी अनुभवलेले आणि त्यांच्या कानावर आलेले मंत्रालयातील प्रतीक भाषणादरम्यान त्यांच्या नेहमीच्या शैलीत म्हणजे हसत हसत व मिश्किलपणे व्यक्त केला. कालच्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या समक्षच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी गिरीष महाजनांना चांगलच धारेवर धरत कानपिचक्या दिल्या आणि महाजनांना त्यांच्या कार्यपद्धतीचा अप्रत्यक्ष संदेश सुद्धा दिला.
महाराष्ट्रातील जल प्रकल्पांसाठी मी केंद्रातून कितीही निधी द्यायला तयार आहे. परंतु, गिरीष महाजन काही कामच करीत नाहीत. याआधी दिलेला निधी सुद्धा खर्च झालेला नाही, असेही गडकरी म्हणाले आणि महाजनांच्या अकार्यक्षमेतेचे वाभाडे सुद्धा काढले. तसेच याआधी गडकरींनी केलेले ‘महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात सध्या ‘चहा पेक्षा किटली गरम’ हे विधान बरेच चर्चेत आले होते आणि त्याचाच संदर्भ या विधानांशी जोडला जात आहे.
