6 May 2024 5:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

कायदेशीर नोटीसवर सुद्धा तनुश्रीला आक्षेप, एकूण भारतीय न्याय पद्धतीवरच तिचा आक्षेप सुरु?

मुंबई : भारतात तुम्ही छळ, अपमान तसेच अन्यायाविरोधात आवाज उठवल्यास तुम्हालाच नोटीस पाठवली जाते, असे तिने म्हटले आहे. तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपानंतर तिला नाना पाटेकर आणि ‘चॉकलेट’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. परंतु तनुश्रीने आता या नोटीसला कायदेशीर मार्गाने आणि सर्व आरोपांचे पुरावे सादर करण्याऐवजी भारतीय लोकतंत्र आणि कायदेशीर प्रक्रियेवरच प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.

त्यात मनसेचे कार्यकर्ते मला धमकी देत आहेत असं सुद्धा तिने म्हटलं आहे. कायदेशीर नोटीसला कायदेशीर पद्धतीने उत्तर देण्याऐवजी तिने पुन्हा आरोप करण्यास सुरुवात केली आहे. आपण पत्रकार परिषदेत जे आरोप केले आहेत ते सर्वांनी सत्य आहेत असे एकतर्फी समजून घ्यावे आणि ज्यांच्यावर ते आरोप करण्यात आले आहेत त्यांनी गप्प गुमानं स्वीकारावे अशी तिची धारणा झाल्याचे चित्र आहे. या कारदेशीर नोटीसला ती उत्तर देणार, की त्याआधीच उत्तर न देता सुट्या संपवून अमेरिकेला परतणार ते पाहावं लागेल.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ताने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. २००८ साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले, असा थेट आरोप तिने एका मुलाखतीत केला. यानंतर तनुश्रीने सातत्याने नाना पाटेकर, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यावर आरोप केले. त्यामुळे तिच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर नानाा पाटेकर आणि विवेक अग्निहोत्री यांनी तनुश्रीला कायदेशीर नोटीस बजावली होती. तनुश्रीने दत्ताने जाहीर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे या नोटीशीत म्हटले होते.

ही नोटीस मिळाल्यावर तिने काल रात्री प्रतिक्रिया दिली आहे. त्यानुसार मला दोन नोटीस आल्या आहेत. एक नाना पाटेकर यांच्याकडून तर दुसरी विवेक अग्निहोत्री यांच्याकडून. भारतात तुम्ही छळ, अपमान आणि अन्यायाविरोधात आवाज उठवल्यास तुम्हालाच नोटीस पाठवली जाते, असे तिने म्हटले आहे. मनसेचे कार्यकर्ते मला धमकी देत असून मला न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला जात आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत भारतातील न्यायव्यवस्था महिला आणि प्रसार माध्यमांना गप्प ठेवू शकते, असे तिने प्रतिक्रियेत म्हटले आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x