रत्नागिरी : सध्या कोकणातील वातावरण महिलांसंबंधित गुन्ह्यांवरून तापताना दिसत आहे. काही दिवसांपूवी सावंतवाडी येथील एका हॉटेलमध्ये मुलीवर बलात्काराची घटना समोर आली होती आणि त्यात शिवसेनेच्या आमदारांची आणि पदाधिकाऱ्यांची नाव त्या हॉटेलच्या मालकीवरून समोर आली होती. त्यात आता कोकणातील अजून प्रकरण आमदार नितेश राणे पत्रकार परिषद घेऊन उघड करणार असल्याचे सूतोवाच देण्यात आले आहेत.

रत्नागिरीचे आमदार तथा म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांचे नाव आता समोर आले आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वीटरवर या प्रकरणाचे सूतोवाच केले आहे. कोकणात शिवसेनेचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांचे कारनामे बाहेर येऊ लागले आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. एका पीडित महिलेने दिलेल्या माहितीवरून त्यांनी हे सूतोवाच दिले आहेत.

एका पीडित महिलेने मला फोन केला आणि माहिती दिली की शिवसेना आमदार उदय सामंत यांनी तिला कसं छळलं ते. पीडित महिला स्वतः समोर येण्यास तयार आहे पण त्या अगोदर सामान्य जनतेसमोर काही गोष्टी स्पष्ट पणे ठेवायच्या आहेत. या विषयावर आम्ही पत्रकार परिषद लवकरच घेणार आहोत अशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.

We will soon take press conference on female harassment against shivsena MLA Uday Samant says MLA Nitesh Rane