30 April 2025 4:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Sneha Aniket Vishwasrao | अभिनेता अनिकेत विश्वासराविरोधात पत्नीचा छळ-मारहाणीचे आरोप | पोलिसात गुन्हा दाखल

Sneha Aniket Vishwasrao

मुंबई, 17 नोव्हेंबर | मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरोधात त्याची पत्नी स्नेहा विश्वासराव (Sneha Aniket Vishwasrao) हिने कौटुंबिक हिंसाचार आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुण्याच्या अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. याचवेळी स्नेहाने आपल्या सासू-सासऱ्यांविरोधात देखील तक्रार केली आहे. याचप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आल्याने मराठी सिनेसृष्टीत मात्र एकच खळबळ उडाली आहे.

Sneha Aniket Vishwasrao. Actor Aniket Vishwasrao’s wife Sneha Aniket Vishwasrao has lodged a complaint with Pune’s Alankar Police Station alleging domestic violence and attempted murder :

अभिनेता अनिकेत विश्वासराव, सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव या तिघां विरोधात सून स्नेहा विश्वासराव हिने कौटुंबिक छळाची तक्रार दाखल केली आहे.

Sneha-Aniket-Vishwasrao

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्नेहा अनिकेत विश्वासराव यांना पती अनिकेत विश्वासराव याने 10 डिसेंबर 2018 ते 2 फेब्रुवारी 2021 या तीन वर्षाच्या काळात सिनेसृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीचं नाव मोठं होईल. या भीतीपोटी वेळोवेळी नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक देणे, गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी स्नेहा विश्वासराव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणात पती अनिकेत विश्वासराव याला सासरे चंद्रकांत आणि सासू अदिती यांनीही साथ दिल्याचं स्नेहाने तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान, आता याच तक्रारीच्या आधारावर पती अनिकेत विश्वासराव, सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Sneha-Aniket-Vishwasrao

अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण यांचा विवाह 2018 साली झाला होता. स्नेहा ही देखील अभिनेत्री असून तिने काही मालिका आणि चित्रपटात देखील काम केलं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून अनिकेत सतत छळ आणि मारहाण करत असल्याचा आरोप स्नेहाने आपल्या तक्रारीत केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पोलिसांकडून अनिकेतवर नेमकी काय कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sneha Aniket Vishwasrao alleging domestic violence and attempted murder against Aniket Vishwasrao.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Entertainment(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या