30 April 2024 11:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | अशी म्युच्युअल फंड योजना निवडा, अवघ्या 25 हजार रुपयांची गुंतवणूक देईल 16 लाख रुपये परतावा Guru Rashi Parivartan | 'या' 4 भाग्यवान राशींमध्ये तुमची राशी आहे? 1 मे पासून गुरू रशिपरिवर्तन नशीब बदलणार Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस?
x

नागपूर भाजप: खून प्रकरणात जन्मठेप झालेल्या गुन्हेगाराला उपाध्यक्ष पद बहाल

नागपूर : एका हत्या प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायालयातून जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नरेंद्र सिंह दिगवा उर्फ डल्लू सरदार याला भाजपाने उत्तर नागपूर मंडळाचा झोपडपट्टी आघाडीचा उपाध्यक्ष पद बहाल केले आहे . विशेष म्हणजे शहरभर त्याच्या समर्थकांनी अभिनंदनाचे फलक झळकावले आहेत.

राज्याचं मुख्यमंत्रि आणि गृहमंत्रीपद असलेल्या फडणवीसांच्या नागपुरात हे अगदी अधिकृत पणे स्वीकारल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. २०१४ मधील निवडणुकीत सुद्धा अशा अनेक गुन्हेगारांना भाजपमध्ये प्रवेश देऊन पावन करण्यात आले होते. दरम्यान, नरेंद्र सिंह दिगवा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी २०१२ मध्ये सुरज यादव या तरुणाची क्रूर हत्या केली होती. तेव्हा दिगवाच्या टोळीवर मोक्का लावण्यात आला होता. त्यामुळे २०१६ मध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाने दिगवासह दहा आरोपींना हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

दिगवा सध्या हायकोर्टातून तात्पुरता जामीन घेऊन बाहेर हिंडत आहे. शहर भाजपने त्याला उत्तर नागपूर मंडळचा झोपडपट्टी सेलचा उपाध्यक्ष बनविले आहे. कदाचित नागपूरकडे मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद असल्याने त्याच्यातल्या गुन्हेगाराच्या अशा पल्लवित झाल्या असाव्यात असं चित्र आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x