13 May 2025 4:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | रॉकेट तेजीत डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: MAZDOCK Reliance Power Share Price | 43 रुपयाच्या शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, शॉर्ट टर्ममध्ये मजबूत रिटर्न - NSE: RPOWER Suzlon Share Price | खरेदी करा सुझलॉन स्टॉक, स्वस्तात खरेदीची संधी, मिळेल जरबदस्त परतावा - NSE: SUZLON IRFC Share Price | पीएसयू शेअर फोकसमध्ये, बुलेट ट्रेनच्या गतीने मिळेल रिटर्न, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IRFC Rama Steel Share Price | 11 रुपयाचा पेनी स्टॉक खरेदीला तुफान गर्दी, मोठी संधी, टार्गेट जाणून घ्या - NSE: RAMASTEEL CDSL Share Price | स्टॉक खरेदीला गर्दी, शेअर प्राईसमध्ये 3.17 टक्क्यांची वाढ, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: CDSL Yes Bank Share Price | जबरदस्त फायद्याची टार्गेट प्राईस, पेनी स्टॉक खरेदी करा, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: YESBANK
x

Twitter Legal Head | इलॉन मस्क यांच्या निशाण्यावर ट्विटरच्या लीगल हेड | कनेक्शन थेट भारतासोबत

Twitter Legal Head

Twitter Legal Head | ट्विटरच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या कायदेशीर आणि पॉलीसी प्रमुख विजया गड्डे या ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क यांच्या टीकास्त्राच्या समोर आल्या आहेत. इलॉन मस्क यांनी भारतीय वंशाच्या विजया गड्डे यांच्याबद्दल ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये मस्क यांनी विजया गड्डे यांचे नाव घेतले नसून त्यांच्या एका निर्णयावर टीका केली आहे.

Elon Musk has made a tweet about Indian-origin Vijaya Gadde. In this tweet, Musk has not named Vijaya Gadde but criticized one of his decisions :

काय आहे नेमकं प्रकरण :
वास्तविक, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या मुलाशी संबंधित एका कथेमुळे न्यूयॉर्क पोस्टचे खाते निलंबित करण्यात आले होते. वृत्तानुसार, विजया गड्डे यांनी हा निर्णय घेतला होता. यासंबंधीच्या ट्विटला उत्तर देताना एलोन मस्क यांनी लिहिले की, ‘खरी गोष्ट प्रकाशित करण्यासाठी एका विशिष्ट वृत्तसंस्थेचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करणे अत्यंत चुकीचे आहे.’ मस्क यांनी विजया गड्डे यांचे नाव घेतले नाही, मात्र मस्क यांनी ज्या ट्विटला हे सांगितले आहे त्यात विजया गड्डे यांचा उल्लेख आहे.

विजया गड्डे या तेव्हा चर्चेत आल्या होत्या जेव्हा त्यांनी अमेरिकेतील हिंसाचारानंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट सस्पेंड केले होते. याआधी त्या भारतातही गेल्या होत्या. त्यावेळी भारत दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती आणि विशेष म्हणजे भारतात लोकसभा वर्षभरावर आलेल्या असताना ती भेट झाली होती. विशेष म्हणजे त्या भेटीत ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सीही उपस्थित होते. या भेटीचे फोटो विजया गड्डे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते.

न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉमधून कायद्याचे शिक्षण :
विजया गड्डे यांनी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉमधून कायद्याचे शिक्षण घेतले. 2011 मध्ये त्यांनी ट्विटर जॉईन केले. त्याच वेळी, 2014 मध्ये, फॉर्च्यून मासिकाने विजया गडदे यांना ट्विटरच्या कार्यकारी टीममधील सर्वात शक्तिशाली महिला म्हणून घोषित केले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Twitter Legal Head Vijaya Gadde in Focus after Elon Musk own Twitter rights 28 April 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या