10 May 2024 1:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

Mutual Fund SIP | हे गुंतवणूक गणित जाणून घ्या | महिना 500 रुपयाच्या एसआयपी'तून तुम्हाला लाखोंचा निधी मिळेल

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | गेल्या काही वर्षांत गुंतवणुकीच्या पसंतीचा पर्याय म्हणून म्युच्युअल फंड उदयास आले आहेत. म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. एफडीमधील घटता व्याजदर आणि म्युच्युअल फंडातील चांगला परतावा या गोष्टीकडे लोकांना आकर्षित करत आहेत. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची असेल तर म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय वाटतो.

गुंतवणुकीचा कालावधी :
गुंतवणुकीचा कालावधी २० किंवा २५ वर्षे किंवा त्याहून अधिक असेल, तर म्युच्युअल फंडांमध्ये तुम्ही बिनधास्त गुंतवणूक करू शकता. चांगली गोष्ट अशी आहे की, इतक्या मोठ्या काळात तुमची छोटी गुंतवणूक रक्कम हा एक मोठा फंड बनेल. येथे आम्ही तुम्हाला ३० वर्षांत ५०० रुपयांची मासिक गुंतवणूक किती करता येईल हे सांगणार आहोत.

एसआयपी आहे सर्वोत्तम पर्याय :
म्युच्युअल फंडातील एसआयपी ही गुंतवणुकीची सर्वोत्तम पद्धत मानली जाते. परताव्याबाबत बोलायचे झाले तर दीर्घ मुदतीतील बहुतांश फंडांचे वार्षिक एसआयपी रिटर्न्स १२ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असू शकतात. आम्ही संबंधित परताव्याच्या आधारे येथे गुंतवणूकीची रक्कम मोजू. एसआयपीचा फायदा असा आहे की आपल्याला बाजारात थेट गुंतवणूकीच्या जोखमीचा सामना करावा लागत नाही.

२० वर्षांचा निधी :
जर तुम्ही 500 रुपयांचा मासिक एसआयपी सुरू केला तर एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार तुम्ही वार्षिक सरासरी 12 टक्के रिटर्नवर सुमारे 5 लाख रुपयांचा फंड तयार करू शकता. २० वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक १.२० लाख रुपये असेल. तर अंदाजित परताव्याची रक्कम ३.७९ लाख रुपये असेल. अधिक परतावा मिळाला तर ही रक्कम मोठी असू शकते.

२५ वर्षांचा निधी :
एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, 500 रुपयांचा एसआयपी 25 वर्षे सुरू ठेवल्यास तुम्ही सुमारे 9.5 लाख रुपयांचा फंड तयार करू शकता. यामध्ये तुमची 25 वर्षातील एकूण गुंतवणूक 1.50 लाख रुपये असेल, तर अंदाजित परताव्याची रक्कम 8.5 लाख रुपयांच्या आसपास असेल.

३० वर्षांचा निधी :
एएसईपी कॅल्क्युलेटरनुसार, ५०० रुपयांचा एसआयपी ३० वर्षे सुरू राहिल्यास १७.६५ लाख रुपयांचा फंड तयार करू शकतो. 30 वर्षात तुमची एकूण गुंतवणूक 1.80 लाख रुपये असेल, तर अंदाजित परताव्याची रक्कम 15.85 रुपये असेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mutual Fund SIP investment with Rs 500 every month check details 01 June 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x