16 May 2024 9:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | बँक FD पेक्षा नोकरदार वर्ग या फंडात पैसे गुंतवतो, लो-रिस्क आणि फायदा मोठा मिळतोय Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

मल्लिकार्जुन खरगेंनी आलोक वर्मा यांना हटविण्यास विरोध दर्शविला

नवी दिल्ली : पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालच्या निवड समितीच्या बैठकीत CBI च्या संचालक पदावरुन आलोक वर्मा यांना तडकाफडकी हटविण्यात आले. दरम्यान, सदर निवड समितीच्या बैठकीत उपस्थित असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आलोक वर्मा यांना हटविण्यास तीव्र विरोध दर्शविला. परंतु, ३ सदस्य असलेल्या या निवड समितीत मोदींनी आणि सर्वोच्च न्यायालयाचे ए. के. सीकरी यांनी आलोक वर्मांच्या उचलबांगडीवर शिक्कामोर्तब केले.

तसेच आलोक वर्मांना अशी शिक्षा दिली जाऊ नये. इतकंच नाही तर त्यांना काही दिवस कार्यालयात येऊन काम सुद्धा करू दिले नाही. त्यामुळे त्यांना ७७ दिवसांची मुदतवाढ द्यायला हवी, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी सुचवले होते. तसेच मल्लिकार्जुन खरगे यांनी दुसऱ्यांदा आलोक वर्मा यांना हटवण्यास विरोध केला आहे. तर, आलोक वर्मा यांच्याविरोधात आरोप असल्याचे न्यायाधीश ए. के. सीकरी यांनी बैठकीत सांगितले असं ते म्हणाले.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x