6 May 2024 6:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

कट्टर शिवसैनिक धर्मवीर विचारतात 'एकनाथ कुठे आहे?' | नेटिझन्स म्हणाले, गुजरातमध्ये सेटलमेंट करत आहेत

Eknath Shinde

Eknath Shinde | महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर आता आणखी एक मोठी घडामोड व्हायची शक्यता आहे. आज संध्याकाळपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संध्याकाळपर्यंत याबाबत घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या सूरतमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 29 आमदार आहेत. हे आमदार आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा देणार नाही, असं पत्र राज्यपालांना देऊ शकतात. या पत्रात शिवसेनेचं नाव घेतलं जाणार नाही, असंही सांगण्यात येत आहे.

ते आमदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात :
दुसरीकडे सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठकीला उपस्थित असलेले 7 आमदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. काल महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या सोबत मंत्री, आमदारही :
गुजरातमधील सुरतमध्ये असलेल्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे हे मुक्कामला असून, त्यांच्यासोबत जवळपास २० पेक्षा अधिक आमदार असल्याची माहिती समोर आली होती. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या मंत्री, आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेसमोर नवं संकट उभं केलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेनेलाच आव्हान दिले :
एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेनेलाच आव्हान दिल्यानं शिवसेनेकडून त्यांच्याबद्दल काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागलं होतं. शिवसेनेकडून पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह दोन नेते सुरतच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, त्यापूर्वीच शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे.

धर्मवीर सिनेमाची ती क्लिप व्हाट्सअँप, फेसबुक सह सर्वत्र व्हायरल :
या बंडानंतर धर्मवीर सिनेमाची एक क्लिप व्हाट्सअँप, फेसबुकसह सर्वत्र व्हायरल होते आहे. त्यात धर्मवीर आनंद दिघे विचारतात ‘एकनाथ कुठे आहे’. यावर नेटिझन्स आणि शिवसैनिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी ते गुजरातमध्ये सेटलमेंट करत आहेत, तसेच अनेकांनी त्यांच्या गद्दारीवर तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही क्लिप अनेकपण शेअर करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde in Gujarat state for political deal with BJP check details 21 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x