3 May 2025 1:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

NPS Investment Benefits | आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी एनपीएस पर्याय प्रचंड फायद्याचा का आहे जाणून घ्या

NPS Investment Benefits

NPS Investment Benefits | जेव्हा आपण निवृत्तीच्या नियोजनाबद्दल बोलतो, तेव्हा तिथेही नॅशनल पेन्शन स्कीमचा (एनपीएस) पर्याय असतो. एनपीएस विशेषत: निवृत्तीनंतरच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. जानेवारी २००४ मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एनपीएस सुरू करण्यात आला. २००९ मध्ये खासगी क्षेत्रासाठीही ते खुले करण्यात आले.

जबाबदारी पेन्शन फंड व्यवस्थापकांकडे :
एनपीएसमध्ये ठेव गुंतविण्याची जबाबदारी पीएफआरडीएने नोंदणी केलेल्या पेन्शन फंड व्यवस्थापकांकडे दिली जाते. ते इक्विटी, सरकारी सिक्युरिटीज आणि बिगर-सरकारी सिक्युरिटीज व्यतिरिक्त निश्चित उत्पन्न साधनांमध्ये आपली गुंतवणूक करतात. जेव्हा जेव्हा आपण एनपीएसची निवड करत असाल, तेव्हा हे जाणून घ्या की खात्यांचे दोन प्रकार आहेत टायर -1 आणि टियर -2.

कर लाभ कुठे मिळेल :
एनपीएस अंतर्गत टियर 1 आणि टियर 2 मध्ये दोन प्रकारची खाती उघडता येतात. यात टियर १ पेन्शन खाते आणि टियर २ व्हॉलेंटरी सेव्हिंग्ज खाते आहे. टियर-१ खाते कोणीही उघडू शकते, परंतु टियर-१ खाते असल्यासच टियर-२ खाते उघडता येते. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एनपीएसमधील योगदानावर मिळणारी करकपात ही केवळ टियर-१ खात्यावरच मिळते.

तुम्हाला अतिरिक्त करबचतीसाठीही मदत :
एनपीएस अंतर्गत आयकर कायद्याच्या कलम ८०सीसीडी (१ब) अंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतची गुंतवणूक अतिरिक्त कर वजावटीसाठी पात्र ठरते. कलम ८०सी अंतर्गत तुम्ही दीड लाख रुपयांपर्यंतची मर्यादा पूर्ण केली असेल तर एनपीएस तुम्हाला अतिरिक्त करबचतीसाठीही मदत करू शकतो. या योजनेच्या मॅच्युरिटीवर ६० टक्क्यांपर्यंत पैसे काढण्यावर कर आकारला जात नाही.

कोणी गुंतवणूक करावी :
‘फिंटू’ या वेल्थ मॅनेजमेंट फर्मचे सीईओ मनीष पी. हिंगर यांच्या मते इक्विटी आणि डेट एक्स्पोजर या दोन्हींचा फायदा करून देण्याच्या विशेष क्षमतेमुळे एनपीएस हा रिटायरमेंट सेव्हिंग्जसाठी गुंतवणुकीचा नेहमीच उत्तम पर्याय राहिला आहे. गुंतवणूकदाराला त्याच्या/तिच्या रिलेशनशिप प्रोफाइलच्या आधारे इक्विटी आणि डेट यांच्यातील गुंतवणूक गुणोत्तर निवडण्याचा पर्याय मिळतो.

एनपीएस हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय :
किमान जोखीम तसेच चांगल्या परताव्याची अपेक्षा असणाऱ्या लोकांसाठी एनपीएस हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. गुंतवणूकदारांना एनपीएसमध्ये एक्स्ट्रा टॅक्स बेनिफिटचा पर्यायही मिळतो. अशा परिस्थितीत, सर्व प्रकारचे कर लाभ घेण्यासाठी टियर 1 खाते निवडणे आवश्यक आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: NPS Investment Benefits need to know check details 03 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या