16 May 2024 4:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका Penny Stocks | तुमचे नशीब बदलू शकतील असे 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्राईस अवघी 1 रुपया ते 9 रुपये
x

अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत अंधेरी पूर्व भाजपकडून मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे अंधेरी पूर्व येथील कार्यसम्राट नगरसेवक मुरजी पटेल, नगरसेविका केसरबेन पटेल आणि त्याची समाजसेवी संस्था ‘जीवन ज्योत प्रतिष्ठान’ यांच्या सहकार्यातून भव्य मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून विशेष उपस्थिती होती.

दरम्यान, या सांस्कृतिक कार्यक्रमांना स्थानिक महिलांची विशेष उपस्थिती होती. यावेळी एका भव्य स्टेजवर निरनिराळ्या मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शिवकालीन देखावे आणि ऐतिहासिक कार्यक्रमावर अधिक भर देण्यात आला होता. अंधेरी महोत्सव हा याच मतदासंघातील बहुचर्चित कार्यक्रम दरवर्षी भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल यांच्याकडून आयोजित केला जातो आणि ती सुद्धा स्थानिक लोकांसाठी एक पर्वणीच असते.

दरम्यान, या कार्क्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून अमृता फडणवीस, आमदार आशिष शेलार, नगरसेवक मुरजी पटेल, नगरसेविका केसरबेन पटेल आणि इतर मान्यवरांची सुद्धा विशेष उपस्थिती होती. जीवन ज्योत प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थेच्या कामातून अंधेरी पूर्वेकडील सर्वच धर्मातील आणि समाजाच्या लोकांमध्ये ज्ञात झालेले भाजपचे विद्यमान नगरसेवक मुरजी पटेल हे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे तगडे उमेदवार म्ह्णून शिवसेना आणि काँग्रेससोबत दोन हात करतील यात शंका नाही. त्यामुळे अशा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनातून महिला आणि तरुणांना सुद्धा पक्षाकडे मोठ्याप्रमाणावर आकर्षित केले जात आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x