
Sri Lanka Crisis | प्रचंड महागाई आणि आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात जाहीर निदर्शने आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी पक्षाच्या नेत्यांना सांगितले आहे की, ते देशाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यास आणि सर्वपक्षीय सरकारसाठी मार्ग तयार करण्यास तयार आहेत. माहितीनुसार, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. श्रीलंकेतील संकट मोठ्या प्रमाणात लोकांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर अधिकच गडद झाले आहे.
पंतप्रधानांच्या खासगी निवासस्थानाला आग लावली :
कोलंबोत रात्रीपासून प्रचंड गोंधळ सुरू होता. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या घराबाहेर आंदोलकांनी गर्दी केली होती. त्यानंतर पंतप्रधानांच्या खासगी निवासस्थानाबाहेर खळबळ उडाली होती. पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाली. अखेर संतप्त आंदोलकांनी पंतप्रधानांच्या खासगी निवासस्थानाला आग लावली.
श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयाचे निवेदन :
श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयाने हे निवेदन जारी केले आहे. निवेदनानुसार; श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा देण्यास तयार असून सर्वपक्षीय सरकारचा मार्ग मोकळा करून देण्याची तयारी असल्याचे सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर राजपक्षे यांना शुक्रवारीच त्यांच्या राहत्या घरातून हटवण्यात आलं असून सध्या ते कुठे आहेत, हे कळू शकलेलं नाही.
श्रीलंकेत शनिवारी मध्य कोलंबोच्या अतिसुरक्षित किल्ला परिसरातील त्यांच्या (राष्ट्राध्यक्षांच्या) अधिकृत निवासस्थानी मोठ्या संख्येने निदर्शक घुसले आणि त्यांनी अडथळे दूर केले आणि राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सुरक्षा कर्मचारी आणि निदर्शकांमध्ये झालेल्या चकमकीत दोन पोलिसांसह किमान 30 जण जखमी झाले.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.