3 May 2024 10:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार?
x

PPF Investment | या सरकारी योजनेत गुंतवणूक करून लाखात ते कोटीत फंड मिळवू शकता | अधिक जाणून घ्या

PPF Investment

PPF Investment | जर तुम्ही अल्पबचत योजनेतून बचतीचा विचार करत असाल तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. पीपीएफ ही दीर्घकालीन बचत करणारी योजना आहे. ‘पीपीएफ’चा मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षांचा असल्याने दीर्घकालीन गुंतवणुकीला चालना मिळते. पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत, तसेच प्रॉव्हिडंट फंडातही तुम्हाला इतर बचत योजनांपेक्षा चांगला व्याजदर मिळेल. ही सरकारी योजना हमी परतावा योजना आहे. ‘पीपीएफ’च्या माध्यमातून ठराविक कालावधीत करोडपती करता येतो. आपण कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत पीपीएफ खाते उघडू शकता.

गुंतवणूक केल्यास आकर्षक व्याज :
पीपीएफवरील व्याजदराचे नियमन केंद्र सरकारकडून दर तिमाहीला केले जाते. केंद्र सरकारने या तिमाहीपर्यंत म्हणजेच सप्टेंबर २०२२ पर्यंत पीपीएफबाबत कोणताही बदल केलेला नाही. या तिमाही अल्पबचत योजनेवर ग्राहकांना 7.1 टक्के व्याजदर मिळणार आहे. पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक व्याज तर मिळतेच पण त्यातून मिळणाऱ्या रिटर्नवर कोणताही कर भरावा लागत नाही.

जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवणूक :
भारत सरकारच्या या दीर्घकालीन बचत योजनेत केवळ भारतीय नागरिकच खाते उघडू शकतात. पीपीएफ’मध्ये तुम्ही जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करू शकता. पीपीएफमध्ये पैसे गुंतवण्याचीही खास सोय आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही दरमहा हप्त्यांमध्ये पैसे जमा करू शकता किंवा दीड लाख रुपये खात्यात एकरकमी जमा करू शकता. सरकार सध्या पीपीएफवर ७.१ टक्के व्याज देत आहे. तसे पाहता पीपीएफचा मॅच्युरिटी पिरियड 15 वर्षांचा आहे, पण जर तुम्हाला पैशांची गरज नसेल तर तुम्ही हा कालावधी आणखी 5 वर्षांनी वाढवू शकता.

काय आहे करोडपती बनण्याचा फॉर्म्युला :
निवृत्तीच्या वेळेपर्यंत कोट्यधीश व्हायचे असेल तर २५ वर्षांसाठी दरमहा १२,५०० रुपये गुंतवावे लागतात. त्यामुळे वर्षभरात ही रक्कम एकूण १ लाख ५० हजार रुपये होईल. 25 वर्षांनंतर जेव्हा तुम्ही हे पैसे काढता तेव्हा ते 103 कोटी रुपये होतील. २५ वर्षांच्या या गुंतवणुकीत मूळ रक्कम 37,50,000 रुपये आणि ७.१ टक्के दराने व्याज ६५,५८,०१५ रुपये असेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: PPF Investment for good long term return check details 11 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x